CJP protest: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP आक्रमक; राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार

Cockroach Janata Party: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा CJP ने दिला आहे. अभिजीत दिपके यांनी देशभरातून दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा दावा करत आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे स्पष्ट केले आहे.
CJP protest
CJP protestsaam tv
Published On: 

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते अभिजीत दिपके यांनी दिला आहे. गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJPकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांनी पद सोडलं नाही, तर दिल्लीत आता ‘जंतर-मंतर 2.0’ आंदोलन होईल, असं सांगितलं होतं.

देशभरातून दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा इशारा

दिपके यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केलीये. ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर देशभरातील कॉकरोच दिल्लीच्या दिशेने मार्च करतील आणि 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर आंदोलन करतील.

दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर ज्या ठिकाणी पोलीस त्यांना थांबवतील, तेच ठिकाण आमच्यासाठी जंतर-मंतर असेल, असंही दिपके यांनी म्हटलंय.

CJP protest
CJP च्या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा! मुंबईत मोठा गोंधळ; पाहा VIDEO

हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केलं जाणार आहे. महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालणार आहोत, असं दिपके यांनी स्पष्ट केलंय.

दिल्ली पोलिसांना काय म्हणाले दिपके?

शांततेने आंदोलन करण्याचा नागरिकांचा अधिकार मान्य करायचा की, 20 जुलैला जंतर-मंतरवर जे घडलं तशीच कारवाई पुन्हा करायची, हे सरकार आणि दिल्ली पोलिसांनी ठरवावं, असे दिपके यांनी म्हटले आहे.

20 जुलै रोजी जंतर-मंतरवर CJPकडून NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर कडक कारवाई केल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला होता. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असतील तर प्रत्येक नागरिकाने या लढ्यात सहभागी व्हावं, असं आवाहनही दिपके यांनी केलं. ही लढाई भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले.

‘ज्ञानूला जावंच लागेल’पासून ‘माझं मत कोणी चोरलं?’ पर्यंत नारे

गांधी जयंतीच्या संध्याकाळी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘ज्ञानू’, ‘ज्ञानेश, बस हो गया भाई’, ‘ज्ञानू को जाना होगा’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. याशिवाय ‘लोकतंत्र को साफ करो’ अशी घोषणाही करण्यात आली. तर बॉलिवूडच्या गाण्याच्या शैलीत ‘मेरा वोट किसने चुराया, ओ सनम? ज्ञानू ने’ असा नारा देण्यात आला

CJP protest
ज्ञानेश कुमारांविरोधाच्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIRतून वगळण्यात आलेल्यांना नोंदणीची पुन्हा संधी

शिवाजी पार्कमध्ये हजारो तरुणांची गर्दी

मुंबईतील दादर बीचपासून सुमारे 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिवाजी पार्कमध्ये काल हजारो तरुण-तरुणी जमा झाले होते. त्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे फलक होते. या फलकांवर निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मजकूर लिहिला होता.

या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी CJPने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने तरुण शिवाजी पार्कमध्ये पोहोचले.

CJP protest
विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

आता ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची तयारी CJPने केली आहे. या आंदोलनात देशभरातून लोक सहभागी होणार असल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com