CJP च्या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा! मुंबईत मोठा गोंधळ; पाहा VIDEO

Jai Shri Ram Slogans During CJP Protest In Mumbai: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनादरम्यान दोन गटांमध्ये गोंधळ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीविरोधात कॉकरोच जनता पार्टीकडून मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, मोठ्या संख्येने तरुणाई आंदोलनस्थळी जमा झाली आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी दोन गटांमध्ये गोंधळ झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एका गटाकडून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवली.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून, आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com