Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Raj Thackeray Uddhav Thackeray joint rally : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक प्रक्रियेतील मुद्द्यांवरून मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त महामोर्चा होणार आहे. राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली.

Thackeray Protest : महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकत्र आले आहेत. येत्या ४ ऑक्टोबर रोजी या दोन्ही पक्षांकडून संयुक्तपणे एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे या मोर्चाची माहिती दिली. आज सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली.

हा मोर्चा केवळ एका पक्षाचा नसून लोकशाहीच्या संरक्षणासाठी तमाम जनतेचा आणि राजकीय व्यवस्थेचा आवाज ठरेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com