Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Gyanesh Kumar Padma Bhushan : पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण देण्याची मागणी केली आहे. SIR आणि मतदार यादीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
Gyanesh Kumar
Gyanesh KumarSaam TV
Published On: 

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे जोरदार समर्थन केले आहे. ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला पाहिजे, अशी मागणी भट्टाचार्य यांनी केली आहे.

विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर सातत्याने टीका केली जात असताना भाजप नेत्याने हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शमिक भट्टाचार्य म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमध्ये अतिशय शांततेत आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पडल्या. राज्यातील सामान्य मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय मतदान करता आले, याचे श्रेय निवडणूक आयोगाला जाते.

Gyanesh Kumar
दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ४१८ 'स्पेशल' ट्रेन्स; तुमच्या मार्गावरील एक्सप्रेस कोणती?

पश्चिम बंगालसारख्या सीमावर्ती राज्यात मतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे हटवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी महत्त्वाची पावले उचलली, असा दावाही भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. या कारवाईला राज्यातील जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Gyanesh Kumar
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

मतदार याद्यांमधील कथित गडबड आणि नावे वगळण्याच्या प्रक्रियेवरून काँग्रेससह विरोधक निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शमिक भट्टाचार्य यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष स्वतःच राहुल गांधींच्या विधानांना गांभीर्याने घेत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com