सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी तुफान गर्दी आणि तिकिटांची मारामार लक्षात घेता मध्य रेल्वेने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. आगामी नवरात्र, पूजा, दिवाळी आणि छठोत्सवासाठी प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून मध्य रेल्वेने विविध मार्गांवर ४१८ उत्सव विशेष गाड्या (Festive Special Trains) चालवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई (CSMT, LTT), पुणे (हडपसर), नागपूर आणि कोल्हापूर येथून उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारत तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांत या विशेष गाड्या धावणार आहेत.
बुकिंग कधीपासून सुरू होणार?
या विशेष गाड्यांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग दोन टप्प्यांत सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील गाड्यांचे आरक्षण २७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल. प्रवाशांना सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर (PRS Counter), IRCTC च्या वेबसाईटवर तसेच RailOne App द्वारे तिकीट बुक करता येईल. जनरल (अनारक्षित) डब्यांसाठी UTS ॲपद्वारे सामान्य दराने तिकिटे उपलब्ध राहतील.
CSMT मुंबई – गोरखपूर – CSMT मुंबई दैनिक विशेष (६४ फेऱ्या)
०१०७९ विशेष दररोज रात्री २२.३० वा. CSMT येथून १६.१०.२०२६ ते १६.११.२०२६ पर्यंत सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वा. गोरखपूरला पोहोचेल. (३२ फेऱ्या)
०१०८० विशेष दररोज दुपारी १४.३० वा. गोरखपूरहून १८.१०.२०२६ ते १८.११.२०२६ पर्यंत सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ००.४० वा. CSMT ला पोहोचेल. (३२ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलिलाबाद.
CSMT मुंबई – चेन्नई – CSMT मुंबई साप्ताहिक एसी विशेष (१२ फेऱ्या)
- ०१०१५ दर बुधवारी ००.३५ वा. CSMT मधून १४.१० ते १८.११.२०२६, चेन्नई बीचला रात्री २३.३० वा. (६ फेऱ्या)
- ०१०१६ दर गुरुवारी ०४.०० वा. चेन्नई बीचहून १५.१० ते १९.११.२०२६, CSMT ला दुसऱ्या दिवशी ०४.०५ वा. (६ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड इत्यादी.
CSMT – बेंगळुरू (SMVB) साप्ताहिक एसी विशेष (१४ फेऱ्या)
- ०१०१३ दर शनिवारी ००.३५ वा. CSMT मधून १०.१० ते २१.११.२०२६
- ०१०१४ दर रविवारी ०४.३० वा. बेंगळुरूहून ११.१० ते २२.११.२०२६
थांबे: पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, धारवाड, हुबळी, दावणगेरे इत्यादी.
CSMT – लातूर – CSMT आठवड्यातून दोन वेळा (२६ फेऱ्या)
- ०११०५ दर मंगळवार/गुरुवार ००.३५ वा. CSMT मधून १३.१० ते २४.११.२०२६, लातूरला ११.४० वा.
- ०११०६ दर मंगळवार/गुरुवार १६.३० वा. लातूरहून, CSMT ला दुसऱ्या दिवशी ०४.१० वा.
CSMT – नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट (१२ फेऱ्या)
- ०२१३९ दर शनिवारी ००.२५ वा. CSMT मधून १७.१० ते २१.११.२०२६
- ०२१४० दर रविवारी १३.३० वा. नागपूरहून १८.१० ते २२.११.२०२६
CSMT – कोल्हापूर साप्ताहिक (१२ फेऱ्या)
- ०१४१७ दर गुरुवारी १४.३० वा. CSMT मधून
- ०१४१८ दर गुरुवारी ००.०५ वा. कोल्हापूरहून
LTT – मऊ – LTT आठवड्यातून दोन वेळा (२४ फेऱ्या)
- ०११२३ दर शुक्रवार/रविवार १२.१५ वा. LTT मधून ११.१० ते २०.११.२०२६
- ०११२४ दर रविवार/मंगळवार ०४.१५ वा. मऊहून
LTT – तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक (१२ फेऱ्या)
- ०१४६३ दर गुरुवारी १६.०० वा. LTT मधून १५.१० ते १९.११.२०२६
- ०१४६४ दर शनिवारी १४.१५ वा. तिरुवनंतपुरमहून
थांबे: पनवेल, रोहा, रत्नागिरी, मडगाव, कारवार, मंगळुरू, कोची, कोट्टायम इत्यादी कोकण मार्गे.
LTT – मडगाव साप्ताहिक (१४ फेऱ्या)* - ०११७९/०११८०
LTT – बनारस आठवड्यातून दोन वेळा (२४ फेऱ्या)* - ०१०५१/०१०५२
पुणे – न्यू अमरावती साप्ताहिक एसी (१२ फेऱ्या)* - ०१४०३/०१४०४
हडपसर – गाझीपूर सिटी आठवड्यातून दोन वेळा (२४ फेऱ्या)* - ०१४३१/०१४३२
हडपसर – गोरखपूर दैनिक (६४ फेऱ्या)* - ०१४१५/०१४१६
नागपूर – हडपसर आठवड्यातून दोन वेळा (२६ फेऱ्या)* - ०१२०१/०१२०२
नागपूर – हडपसर साप्ताहिक (१४ फेऱ्या)* - ०१२०९/०१२१०
कोल्हापूर – कलबुर्गी – कोल्हापूर (शुक्रवार वगळता ५ दिवस) (६४ फेऱ्या)* - ०१४५१/०१४५२
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.