शनिदेवाची कृपा बरसणार! 'या' ६ राशींच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपले; व्यवसाय-नोकरीत होणार प्रगती

Shani Latest news : शनीदेवाच्या मार्गी चालीचा ६ राशींवर शुभ प्रभाव पडण्याची ज्योतिषीय शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो ते जाणून घ्या.
Horoscope
HoroscopeSaam Tv
Published On: 

Saturn Transit Shani Vakri Margi 2026 : शनीदेवाला ज्योतिषशास्त्रामध्ये कर्मफळदाता आणि न्यायाचा देव मानले जाते. जेव्हा शनीच्या चालीत बदल होतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यावर पडतो. शनी सध्या वक्री (उलट) चालीने भ्रमण करत आहे. लवकरच शनीदेव सरळ चाल होणार आहेत. शनीच्या या महत्त्वाच्या बदलामुळे अनेक राशींना लागलेले आर्थिक संकट आणि मानसिक त्रास दूर होण्यास मदत होणार आहे. पुढील काही दिवस ६ राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

मेष (Aries):

मेष राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी चाल अत्यंत लाभदायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील.

वृषभ (Taurus):

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम वेळ आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील.

Horoscope
Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

मिथुन (Gemini):

शनीच्या सरळ चालीमुळे मिथुन राशीच्या लोकांना मानसिक तणावातून मोठा दिलासा मिळेल. आरोग्य सुधारेल आणि कुटुंबातील मतभेद दूर होतील. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नवीन रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील.

तुळ (Libra):

तुळ राशीवर शनीदेवाची विशेष कृपा राहील. व्यवसायात मोठा आर्थिक फायदा संभवतो. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता असून समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

Horoscope
Rain : पुढील २४ तास अत्यंत मुसळधार! ८ राज्यांमध्ये अति-मुसळधार पावसाचा हायअलर्ट; महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?

धनू (Sagittarius):

धनू राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. शनीच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ (Aquarius):

कुंभ ही शनीची स्वतःची राशी आहे. शनी मार्गी झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांचा साडेसातीचा त्रास कमी होईल. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याचे योग आहेत आणि अडकलेले पैसे परत मिळतील.

डिस्क्लेमर (Disclaimer):

या बातमीतील माहिती ही ज्योतिषशास्त्राच्या गणितावर आधारित आहे. यातील तथ्यांची पुष्टी करत नाही. कोणतीही वस्तू, उपाय किंवा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com