Who Is Gyanesh Kumar: नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोण आहेत? राम मंदिराशी आहे कनेक्शन

Election Commissioner Of India: लोकसभा निवडणुकीपूर्वी सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Who Is Gyanesh Kumar
Who Is Gyanesh KumarSaam Tv
Published On

Who Is Gyanesh Kumar:

लोकसभा निवडणुकीपूर्वी सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी दुपारी ही माहिती दिली. अधीर रंजन चौधरी हे देखील निवडणूक आयुक्तांच्या निवडीशी संबंधित समितीचा एक भाग आहेत.

निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश हे मूळचे आग्रा येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेश बोर्डातून 10वी आणि 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर नागरी सेवांकडे वळले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is Gyanesh Kumar
Petrol Diesel Price Drop: मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केली मोठी कपात

देशाचे नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता हे डॉक्टरांच्या कुटुंबातून आले आहेत. विजय नगर कॉलनीत राहणारे ज्ञानेश कुमार गुप्ता हे गेल्या काही वर्षांत देशात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी होते. काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा तिहेरी तलाकचा निर्णय घेणे आणि राम मंदिर उभारणीत भूमिका घेणे असो. ज्ञानेश कुमार गुप्ता यांचे वडील सेवानिवृत्त सीएमओ आहेत आणि सध्या श्री राम सेंटेनियल शाळेचे संचालक आहेत. त्यांच्या आईचे नाव सत्यवती आहे. (Latest Marathi News)

ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल माहिती देताना डॉ. सुबोध गुप्ता यांनी सांगितले की, ''लहानपणापासूनच हुशार असलेल्या ज्ञानेश कुमारने हायस्कूल आणि इंटरमिजिएटमध्ये टॉप केले. यानंतर त्यांनी आयआयटीमध्ये प्रवेशासाठी परीक्षा दिली आणि कानपूर आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. इथून अभ्यास करून पुढे काय करायचे याचा पुन्हा त्यांचा सुरु झाला. अशातच नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. देवाच्या कृपेने ज्ञानेश कुमार यांची निवड झाली.''

Who Is Gyanesh Kumar
CAA Act: 'सीएए लागू होऊ देणार नाही', तामिळनाडू-बंगालनंतर केरळ राज्याचाही विरोध

त्यांनी पुढे सांगितलं, ''यानंतर त्यांना केलर कॅडर आयएएस म्हणून मिळाले आणि तेथील विविध पदांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर त्यांची केंद्रात नियुक्ती करण्यात आली. कलम ३७० हटवताना १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार केंद्रीय गृहमंत्रालयात काश्मीरची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. ते संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव होते. यानंतर त्यांची सहकार मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. ३१ जानेवारीला निवृत्तीनंतर अवघ्या दीड महिन्यानंतर त्यांना मोठी घटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com