

ही घटना घडताच जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. काही प्रवासी बसमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आलं.
ही बस राजस्थानमधील बांसवाडामधून सूरतकडे जात होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालकाला प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे हा अपघात घडला आणि बस थेट समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ आणि आरडाओरड झाला. स्थानिक लोकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्य सुरू केले.
घटनेनंतर जरोद पोलिसांसह एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि वडोदरा अग्निशमन विभागाच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींना तातडीने वडोदऱ्यातील येथील एसएसजी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
या अपघातामुळे वडोदरा–जरोद हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मृतांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून परिस्थिती गंभीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.