Shocking: पान टपरीचं एका महिन्याचं बिल १.१२ लाख, आकडा पाहून व्यावसायिकाने आयुष्य संपवलं

Electricity Bill: उत्तर प्रदेशमध्ये एका पान विक्रेत्याने विष पिऊन आत्महत्या केली. त्याची पानाची टपरी होती आणि त्याचे १ महिन्याचे बिल १.१२ लाख रुपये आले होते. वीज बिलाचा आकडा पाहून चिंतेत येऊन त्याने टोकाचे पाऊल उचलले.
Shocking: पान टपरीचं एका महिन्याचं बिल १.१२ लाख, आकडा पाहून व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
Electricity BillSaam Tv
Published On
  • उत्तर प्रदेशमध्ये ५५ वर्षीय पान विक्रेत्याची आत्महत्या

  • १.१२ लाखांच्या वीज बिलामुळे आला चिंतेत

  • सुसाईड नोटमध्ये वीज विभागाकडून छळाचा आरोप

  • घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली

उत्तर प्रदेशमध्ये विद्युत विभागाचे एक एक कारनामे समोर येत आहेत. या विद्युत विभागाच्या त्रासाला कंटाळून एका ५५ वर्षीय पान विक्रेत्याने आत्महत्या केली. या पान विक्रेत्याला १.१२ लाकांचे वीज बिल आले होते आणि ते भरण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जा होता. याच त्रासाला कंटाळून त्याने सोमवारी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कश्यप असं आत्महत्या केलेल्या ५५ वर्षीय पान विक्रेत्याचे नाव होते. तो मुराडचक गावात कुटुंबीयांसोबत राहत होता. आत्महत्या करण्यापूर्वी या पान विक्रेत्याने सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये विद्युत विभागाकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आला आहे. सुरेंद्र कश्यप यांचे मुराडचक येथील आरोग्य केंद्राबाहेर एक छोटे पानााचे दुकान होते. हा व्यवसाय करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सुरेंद्र यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता विषारी औषध प्यायले. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Shocking: पान टपरीचं एका महिन्याचं बिल १.१२ लाख, आकडा पाहून व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
Crime News: बायकोचे अनैतिक संबंध, विम्याच्या पैशांसाठी घेतला नवऱ्याचा जीव... सिनेमालाही लाजवेल अशी क्रूरता

सुरेंद्र कश्यप यांच्या पत्नीने सांगितले की, गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी विद्युत विभागाच्या दक्षता पथकाने त्यांच्या घरी तपासणी केली होती. चार ते पाच ते पाच महिन्यांनंतर त्यांना १.१२ लाख थकबाकीसाठी नोटीस पाठवण्यात आली. कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणींमुळे एवढी मोठी रक्कम भरण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला जात होता. सतत त्यांना त्रास दिला जात होता. मुदत उलटून गेल्यानंतर तहसील विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले.

Shocking: पान टपरीचं एका महिन्याचं बिल १.१२ लाख, आकडा पाहून व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आल्यानंतर सैदपूर तहसीलकडून थकबाकी भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. सुरेंद्र यांनी मित्र आणि ओळखीच्या काही लोकांकडून पैसे उधार घेतले होते आणि काही रक्कम हप्त्यामध्ये भरली. पण २ महिन्यांमध्ये ते पूर्ण पैसे भरु न शकल्यामुळे त्यांचा दबाव टाकला जाऊ लागला. घर जप्त करण्याचे, दुकान बंद करण्याचे, तुरुंगात टाकण्याचे आणि ठार मारण्याची धमकी दिली जात होती. सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात बायको, दोन मुलं, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Shocking: पान टपरीचं एका महिन्याचं बिल १.१२ लाख, आकडा पाहून व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com