Sanchita Ugale Death: 'तिचा छळ केला जात होता...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, वडिलांचा खळबळजनक आरोप

Sanchita Ugale Death: 'कुमकुम भाग्य' फेम संचिता उगलेच्या निधनाने खळबळ उडाली आहे. मानसिक तणाव आणि छळाचा आरोप करत वडिलांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून पोलिस तपास सुरू आहे.
Sanchita Ugale Suicide
Actress Death SAAM TV
Published On

Sanchita Ugale Death: टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगलेच्या अकस्मात निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या संचिताने १४ जून रोजी नालासोपारा (पूर्व) येथील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांनी मुलीच्या मानसिक स्थितीबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून संचिता मानसिक तणावातून जात होती. वरकरणी ती आनंदी आणि सामान्य दिसत असली तरी अनेकदा ती अस्वस्थ राहत असे. तिच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे ती कुटुंबीयांना स्पष्टपणे सांगत नव्हती.

Sanchita Ugale Suicide
Govinda: गोविंदाच्या डोक्यावर नाहीत केस; पत्नी सुनिता पोलखोल करत म्हणाली, 'राजा बाबू वापरतात हेअर पॅच...'

एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मच्छिंद्र उगले म्हणाले, “ती खूप स्ट्रेसमध्ये असायची. कधी कधी सर्व काही ठीक असल्यासारखे वाटायचे, पण ती डिप्रेशनमध्ये जात असे. आम्ही तिची काळजी घेत होतो, तिला शक्यतो एकटे सोडत नव्हतो, मात्र तिच्या मानसिकता आम्हाला समजू शकली नाही.”

Sanchita Ugale Suicide
Actress Death: घरात मृतावस्थेत आढळली प्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या तिच्या आयुष्यातील 'या' खास गोष्टी

याचबरोबर त्यांनी मुलीला काही काळापासून त्रास दिला जात असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. कोणाचेही नाव न घेता त्यांनी सांगितले की, काही व्यक्तींकडून पैशांच्या आणि इतर मागण्यांच्या माध्यमातून तिच्यावर दबाव टाकला जात होता. “तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता. विविध प्रकारे तिच्यावर दबाव आणला जात होता. सत्य लवकरच समोर येईल, पण ती अशा भयानक परिस्थितीचा सामना करत होती हे नक्की,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणाबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. माहितीनुसार, संचिताचा मृतदेह घरातील एका खोलीत आढळला होता. खोली आतून बंद होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com