Actress Death: टीव्ही आणि मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री संचिता उगले हिचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. नालासोपारा येथील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली. या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीसह तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संचिता आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होती. रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे सांगितले जात असून त्या वेळी ती घरी एकटीच होती. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संचिता उगलेने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते. ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय 'वागले की दुनिया' या मालिकेतही तिनं काम केलं. तसेच 'दंगल टीव्ही' वाहिनीवरील, 'दिलवाली दुल्हा लै जाएगी' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
टेलिव्हिजनसोबतच संचिता मोठ्या पडद्यावरही झळकली होती. विकी कौशल अभिनीत छावा या चित्रपटात तिने ताराराणींची महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच सायलन्स २: द नाईट आउल बार शूटआउट या चित्रपटातही ती झळकली होती. अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील होती. संचिता ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने शून्यातून आपली कारकीर्द सूरु केली. या शोसाठी तिचे मानधन दररोज ५०,००० ते १ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज वर्तवला जात असला, तरी तिची नेमकी एकूण संपत्ती (नेट वर्थ) सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.
संचिता सोशल मीडियावरही सक्रिय होती. तिच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे तिच्या अकस्मात निधनाच्या वृत्ताने चाहते अधिकच हळहळ व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.