Gujarat Plane Crash
Gujarat Plane CrashSaam Tv

Gujarat Plane Crash: मोठी बातमी! गुजरातमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मेघनीनगरमध्ये भीषण आग अन् धुरांचे लोट

Air India Plane Crash Gujarat: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबातमधील मेघनीनगर या रहिवासी परिसरात प्रवासी विमान कोसळलं. या विमान अपघातानंतर भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.
Published on

गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं. अहमदाबादच्या मेघानीनगर या रहिवासी परिसरात हे विमान कोसळलं. रहिवासी परिसारत हे विमान पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. विमान पडल्यानंतर भीषण आग लागली. हे विमान एअर इंडियाचे असल्याची माहिती समोर आली आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी विमान अपघात झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडली. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली आणि परिसरात धुरांचे लोट पसरले. हे विमान लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी होते. टेकऑफ घेताच हे विमान कोसळले.

सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाच्या हद्दीजवळ विमान कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामध्ये विमानाचे तुकडे झाले. सध्या घटनास्थळावर बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Gujarat Plane Crash
Gujarat Tourism : थंड हवा अन् कमी गर्दी; गुजरातमधील 'या' ठिकाणाला पर्यटकांची पहिली पसंती

दरम्यान, विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. विमान अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये अपघातस्थळावर काळ्या रंगाच्या धुराचे लोट सगळीकडे पसरल्याचे दिसत आहे. बीएसएफ आणि एनडीआरएफची टीम अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान ११ वर्षे जुने होते.

Gujarat Plane Crash
Gujarat Helicopter Crash : गुजरातच्या पोरबंदरमध्ये ALH हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; तटरक्षक दलातील तिघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com