
Chhatrapati Sambhajinagar Flight storm turbulence flightews: छत्रपती संभाजीनगरमध्ये काल सायंकाळी सुरू असलेल्या भीषण वादळात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे सुरू असल्याने आत बसलेल्या प्रवाशांचा थरका उडाला होता. वादळ इतके होते की छत्रपती संभाजीनगरमध्ये विमान आल्यानंतर ते खालून वर आणि वरून खाली अशा हेलकावे घेत होते.
विमान शेवटी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरवता आले नाही. त्यामुळं पुन्हा छत्रपती संभाजीनगरवरून(Chhatrapati Sambhajinagar) नाशिकच्या ओझर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमान नाशिकला गेल्यानंतर ३० ते ३५ प्रवासी तेथेच उतरून गेले. या विमानाने पुन्हा छत्रपती संभाजीनगरला येण्यास त्यांनी नकार दिला.
वादळात विमान कधी एका बाजूने, तर कधी दुसऱ्या बाजूने झुकत होते. आम्ही जीव मुठीत घेऊनच बसलो होतो. खूप थरारक अनुभव आला. अखेर सुखरूपपणे आलो. आम्ही पायलटचे आभार मानले असे विमानात प्रवास केलेल्या छत्रपती संभाजी नगरच्या गीता आचार्य यांनी सांगितले. सायंकाळी वादळात इंडिगोचे दिल्ली छत्रपती संभाजीनगर विमान सापडले. विमानाने कधी डाव्या, तर कधी उजव्या बाजूने हेलकावे घेतले. या प्रकाराने प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला.
विमान नाशिककडे वळवावे लागले. इंडिगोचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान हे दररोज सायंकाळी ६:२५ वाजता शहरात येऊन दिल्लीसाठी रवाना होते. ते बुधवारीही शहराच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले. परंतु, त्याच वेळी शहरात वादळ सुटले होते. अशा परिस्थितीत विमान(Plan) कधी एका बाजूला, तर कधी दुसऱ्या बाजूने हेलकावे घेत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे वैमानिकाने विमान नाशिककडे वळविले. हे विमान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा शहरात दाखल झाले.
टीप: हा विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.