Gujarat Helicopter Crash : गुजरातच्या पोरबंदरमध्ये ALH हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; तटरक्षक दलातील तिघांचा मृत्यू

ALH Helicopter Crash : तटरक्षक दलातील ध्रुव हेलिकॉप्टराचे नियमित प्रात्यक्षिक सुरु होते. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
Gujarat Helicopter Crash
Gujarat Helicopter CrashSaam Tv
Published On

Gujarat Helicopter Crash : गुजरातमधील पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तटरक्षक दलाच्या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर जखमींना त्वरीत उपचारासाठी पोरबंदरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिघांना मृत घोषित केले.

पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांनी पोरबंदरमध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दलातील तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे लागलेली आग विझवण्याचा आणि जखमींना बाहेर करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी केला.

Gujarat Helicopter Crash
Accident : २ वर्षांपूर्वी सुदैवानं वाचला, आता काळाने घाला घातला; ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू

या घटनेचा व्हिडीओ सोशल व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर दिसत आहे. त्याशिवाय हेलिकॉप्टरमधून काळा धूर येत असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये अग्निशमन दल आणि स्थानिक अधिकारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तेथे पाहायला मिळते. अपघात कसा झाला, त्यामागील कारण काय आहे याचा तपास तटरक्षक दलाचे अधिकारी करत आहे.

दरम्यान पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथ सिंह जडेजा यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी ही घटना रविवारी (५ जानेवारी) घडली आहे. ALH ध्रुव हेलिकॉप्टरचे नियमित प्रात्यक्षिक सुरु असताना हा अपघात घडला. यात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. प्राथमिक तपासात हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा भीषण अपघात घडला असे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी ALH हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघातामुळे संरक्षण दलातील हेलिकॉप्टर्सच्या अपघाताची मालिका सुरु असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Gujarat Helicopter Crash
Kolhapur Crime : एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com