Mumbai Indians साठी 'गुजरात' अनलकी, MI पलटनचं सहावी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगणार?

MI Vs PBKS IPL 2025 Eliminator 2 : गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हा क्वालिफायर २ सामना खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansX
Published On

IPL 2025 मधील क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना गुजरातमधील अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो फायनलमध्ये एन्ट्री मारेल. तो संघ फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळेल. ३ जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

आयपीएल २०२५ मधील क्वालिफायर २ आणि फायनल हे दोन्ही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जाणार आहे. सुरुवातीला हे दोन्ही सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळले जाणार होते. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आणि शेवटचे दोन्ही सामने कोलकाता ऐवजी अहमदाबादला खेळवले जातील असा निर्णय घेण्यात आला.

Mumbai Indians
RCB च्या 'इ साल कप नमदे'साठी मुंबईचा पराभव आवश्यक; गुजरात टायटन्सच्या कामगिरीकडे लक्ष

क्वालिफायर २ आणि फायनल हे सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर असणे ही बाब मुंबईसाठी धोक्याची आहे. अलिकडच्या काळात मुंबई इंडियन्सला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या स्टेडियमवर मुंबईने मागील पाच सलग सामने गमावले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबईचा फॉर्म खराब आहे. २०२१ पासून अहमदाबादमध्ये मुंबईला विजय मिळवता आलेला नाही.

Mumbai Indians
Jasprit Bumrah : मी तर चाल्लोय... महत्त्वाच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहचं धक्कादायक वक्तव्य, चाहत्यांचं टेन्शन वाढलं

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे मुंबई इंडियन्सचे शेवटचे ५ सामने:

- २९ मार्च २०२५ – गुजरात टायटन्स विरुद्ध

मुंबईचा ३६ धावांनी पराभव

- २६ मे २०२३ – गुजरात टायटन्स विरुद्ध (क्वालिफायर २)

मुंबईचा ६२ धावांनी पराभव

- २५ एप्रिल २०२३ – गुजरात टायटन्स विरुद्ध

मुंबईचा ५५ धावांनी पराभव

- ६ मे २०२२ – गुजरात टायटन्स विरुद्ध

मुंबईचा ५ धावांनी पराभव

- १ मे २०२१ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध

मुंबईचा ७ गडी राखून पराभव

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबईला चांगला खेळ करता आला नसल्याने, मागील आकडीवारीमुळे मुंबईचा संघ आणि त्यांचे चाहते यांची चिंता वाढली आहे. मुंबईने आयपीएलची ट्रॉफी तब्बल पाच वेळा जिंकली आहे. यंदाच्या वर्षी जर त्यांनी विजेतेपद कमावले, तर सहा वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर होईल.

Mumbai Indians
Qualifier 2 खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स बाहेर पडेल, पंजाबला होणार मोठा फायदा; कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com