Qualifier 2 खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स बाहेर पडेल, पंजाबला होणार मोठा फायदा; कारण...

MI VS PBKS Qualifier 2 : गुजरातचा पराभव केल्यानंतर मुंबईचा संघ क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्स विरद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई-पंजाब यांच्यापैकी जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाईल.
Mumbai Indians IPL 2025
Mumbai Indians IPL 2025X
Published On

IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यामध्ये गुजरात टायटन्सला पछाडून मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये धडक मारली आहे. दुसऱ्या बाजूला क्वालिफायर १ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत होऊन पंजाब किंग्सचा संघ क्वालिफायर २ मध्ये गेला आहे. आता मुंबई आणि पंजाब यांच्यातील जो संघ क्वालिफायर २ जिंकेल, तो फायनलमध्ये जाईल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा क्वालिफायर २ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पण जर सामन्यादरम्यान पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला फायदा होईल? कोणता संघ फायनलमध्ये जाईल? चला जाणून घेऊयात.

Mumbai Indians IPL 2025
Video : लज्जास्पद! भारताला शिव्या देणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे दुबईत भारतीयांकडून स्वागत? केरळ समुदाय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

आयपीएलच्या नियमांनुसार, जर क्वालिफायर २ सामन्यात पाऊस पडला आणि सामना पावसामुळे रद्द झाला, तर जो संघ पॉईंट्स टेबलवर वरच्या स्थानी असेल, तो फायनलमध्ये जाईल. सध्या पंजाबचा संघ १९ गुणांसह टॉपवर आहे. मुंबई १६ गुणांसह पॉईंट्स टेबलवर चौथ्या स्थानी आहे. तेव्हा जर पावसामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे सामना रद्द झाला. तर मुंबईचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात येईल.

Mumbai Indians IPL 2025
Video : मुंबईने गुजरातला हरवलं अन् आशिष नेहराच्या मुलांना धक्का बसला; धाकटा ढसाढसा रडला, तर लेकीने अश्रू लपवले

जर मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील सामन्यात पावसाने काही काळासाठी व्यत्यय आणला तर सामना थोड्या वेळासाठी पुढे ढकलण्यात येईल. प्लेऑफ सामन्यांसाठी आयपीएलमध्ये काही अतिरिक्त वेळ राखून ठेवला जातो. क्वालिफायर २ सामना उशिरा सुरु झालाच, तर सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटे म्हणजेच २ तास दिले जाऊ शकतात. पण पावसामुळे सामना रद्द झाला, तर मुंबई बाहेर जाईल. कारण क्वालिफायर २ साठी कोणताही रिझर्व्ह डे चा पर्याय नाहीये.

Mumbai Indians IPL 2025
Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com