Video : लज्जास्पद! भारताला शिव्या देणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे दुबईत भारतीयांकडून स्वागत? केरळ समुदाय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Kerala Community Welcomes Shahid Afridi In Dubai : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दुबईत भारतीयांकडून शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत होत असल्याचे पाहायला मिळते. पण हा व्हिडीओ खरा आहे का? जाणून घ्या व्हिडीओचं सत्य...
Kerala Community Welcomes Shahid Afridi In Dubaiं
Kerala Community Welcomes Shahid Afridi In DubaiX
Published On

Kerala Community Welcomes Shahid Afridi In Dubai? पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने अनेकदा भारताच्या विरुद्ध वक्तव्य केले. त्याने भारतीय सैन्यावर टीका देखील केली होती. यामुळे आफ्रिदी विरोधात भारतभर आक्रोश पाहायला मिळाला.

शाहिद आफ्रिदीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आफ्रिदी एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. दुबईमध्ये राहणाऱ्या केरळच्या लोकांनी आफ्रिदीचे जोरदार स्वागत केले. पाकिस्तान असोसिएशनद्वारे दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान हॉलमध्ये प्रवेश करताच मल्याळी समुदायाच्या काही सदस्यांनी बूम-बूम अशा घोषणा देत आफ्रिदीचे स्वागत केले.

Kerala Community Welcomes Shahid Afridi In Dubaiं
RCB जर IPL 2025 जिंकले तर एक दिवसाची सुट्टी; चाहत्याच्या विनंतीवरून ऐतिहासिक निर्णय जाहीर करणार?

शाहिद आफ्रिदीने त्याचे चाहते बूम-बूम आफ्रिदी असे म्हणतात. दुबईमधल्या कार्यक्रमामध्ये केरळ समितीच्या सदस्यांनी बूम-बूम म्हणत आफ्रिदीचे स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन दुबईतील केरळ समिती आणि मल्याळी समुदायावर टीका केली जात आहे, त्यांना ट्रोल केले जात आहे.

Kerala Community Welcomes Shahid Afridi In Dubaiं
Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

शाहिद आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. जो माणूस भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, जो भारतावर, भारताच्या लष्करावर टीका करत आहे, अशा व्यक्तीचे स्वागत आपल्याच देशातील काही लोक करत आहेत. ही लज्जास्पद गोष्ट आहे, असे अनेकजण म्हणत आहेत. शाहिद आफ्रिदीचे स्वागत करणारे लोक हे क्यूबा समुदायाचे असल्याचे म्हटले जात आहे. हा दुबईतील केरळ समुदायाचा एक भाग आहे.

Kerala Community Welcomes Shahid Afridi In Dubaiं
Mumbai Indians : ...तर मुंबई इंडियन्स बाहेर जाईल! IPL चा नियम ठरणार कर्दनकाळ, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com