गांधीनगर : गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. गुजरातमधील दहेगाम तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. दहेगाममध्ये गणेश विसर्जनावेळी ९ जण बुडाले. त्यातील ८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. ९ पैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याने ऐन गणेशोत्सवात त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गुजरातमध्ये नदीत ८ जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. नदीत बुडालेल्या भाविकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी देखील गुजरातच्या पाटन जिल्ह्यात देखील अशीच दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ४ जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या देहगामात आज दुपारी ९ लोक नदीकाठी आले होते. नदीकाठी गणेश मूर्ती विसर्जन करत होते. यावेळी एक जण आंघोळ करताना नदीत बुडाला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी इतर लोकांनी उडी मारल्या. त्यानंतर त्यांचाही बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, नदीत फक्त ८ जण बडाले. या सर्व जणांचे मृतदेह पाण्यात बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत आणखी कोण बुडाले आहे का, याची तपासणी करण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच देहगाम नगर पालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. रेस्क्यू दरम्यान ८ जणांना बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगरचे पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनविषयी माहिती घेतली. घटनास्थळी लोक जमा झाले होते. या घटनेने गावात शोककळा पसरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.