वाकोद (जळगाव) : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान रात्रीपासून जामनेर तालुक्यातील वाकोदसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नद्या, नाले तुडुंबं भरून वाहू लागले आहेत. यामुळे वाघुर नदीला गेल्या २० वर्षात पहिल्यांदा मोठा पूर आला असून नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने वाकोद- तोंडापूरचा संपर्क तुटला आहे.
अजिंठा लेणी (Jalgaon) परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. दरम्यान वाघूर नदीचे उगमस्थान असलेल्या अजिंठा लेणीत पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. वाघूर नदीला खूप वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पूर (Flood) आल्याने नागरिक पूर पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहे. तर नदी काठच्या शेतात पाणी भरले अडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, कपाशी, मका पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदील झाले आहे.
वाघूर नदीचा पूल धोकादायक स्थितीत
नुकताच डागडुजी करण्यात आलेला वाकोद- फर्दापूर रस्त्यावरील पूल देखील धोकादायक स्थितीत असून या पुरामुळे या पुलाला देखील पुलाच्या खालील भागात तडे गेलेले असून या पुलावरून वाहन जातांना तेथे कंप होत आहे. नवीन पूल बांधकाममधील अडथळा दूर झाल्यानंतर देखील त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असून प्रशासन अजून किती दिवस जुन्या पुलावरून वाहतूक करण्यास भाग पाडत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.