सध्या गुजरातमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. इतकंच नाही तर या पूराचा फटका टीम इंडियाच्या एका क्रिकेटरला देखील बसला आहे. भारतीय महिला टीमची क्रिकेटर आणि स्टार गोलंदाज राधा यादव या पूरात फसली होती.
टीम इंडियाची गोलंदाज राधा यादव गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी राहते. राधा तिच्या परिवारासोबत राहत असून ती या पूरात फसल्याचं दिसून आलं. यानंतर एनडीआरएफच्या टीमने तिला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढलं. यानंतर राधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत NDRF च्या टीमचे आभार मानले आहेत.
गुजरातमध्ये पूराच्या समस्येने जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. या पूरात काही लोकांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. या पूराच्या तडाख्यात हजारो लोकांना आपण घर सोडून निघून जावं लागलं. यावेळी सरकारकडून बचावकार्य सुरु होतं. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७ हजांराहूंन अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
दुसरीकडे या पूरामध्ये राधा यादव आणि तिचं कुटुंबही फसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर एनडीआरएफच्या टीमने राधाला तिच्या परिवारासह बाहेर काढण्यास मदत केली. राधा यादवने म्हटलं आहे की, या ठिकाणची परिस्थिती फार वाईट असून मी एनडीआरएफच्या टीमचे आभार मानते, ज्यांनी आम्हाला सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यास मदत केली.
टीम इंडियाचा क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये ती पूरग्रस्तांना मदत करतेय. रिवाबा जडेजा जामनगरमधील आमदार आहे. या व्हिडीओमध्ये रिवाबा म्हणते की, निसर्गाच्या गोष्टी आपल्या हाहत नसल्या तरीही आपण आपल्या लोकांचं संरक्षण करू शकतो. या व्हिडीओमध्ये रिवाबा पूरग्रस्त रस्त्यावर फिरताना दिसतेय आहे. ती रस्त्यावर फिरून लोकांना भेटतेय. रिवाबासोबत उपस्थित असलेल्या रेस्क्यू टीमने लोकांना कठीण परिस्थितीतून वाटवलं असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.