आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. आसाममधील हायप्रोफाईल जोरहाट जागेचा निकाल जाहीर झाला असून, येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजप उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला आहे. भाजप नेते हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी या जागेवर सुमारे २०,००० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांचा त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याने, म्हणजेच भाजपच्या हितेंद्रनाथ गोस्वामी यांनी पराभव केला. विशेष म्हणजे, गौरव गोगोई यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती, तर गोस्वामी हे पाच वेळा आमदार राहिले आहेत. गोस्वामी यांनी यापूर्वी तीनदा आसाम गण परिषद (AGP) कडून आणि दोनदा भाजपकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला आहे.
आसाममधील सर्व १२६ विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. विशेष म्हणजे गौरव गोगोई हे जोरहाटचे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. अहोम समुदायाचा बालेकिल्ला असलेल्या या जागेकडे २०२६ च्या निवडणुकीतील सर्वात महत्वाची रणभूमी म्हणून पाहिले जात होते. काँग्रेसमधील आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी ही जागा जिंकणे गोगोईंसाठी अनिवार्य होते. मात्र, या पराभवामुळे गौरव गोगोई आणि काँग्रेसच्या रणनीतीला मोठा तडा गेल्याचे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.