पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या निकालांचे कल बघता भाजप एकहाती सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशभरातील भाजप नेते, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. १५ वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन होत आहे. भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचं स्पष्ट होताच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट ममता बॅनर्जींचे घर गाठले. ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय होणार असल्यानं पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कोलकाता येथील पक्षाच्या कार्यालयात झालमुडी वाटून विजयी जल्लोष केला. दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा गाठला असून, विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, संध्याकाळपर्यंत निकाल बदलतील. विजय आपलाच होईल, असा विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.