Shocking: सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Septic Tank Cleaning Accident: बिहारमध्ये सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना घडली. सेफ्टिक टँकमधील विषारी वायूमुळे ७ जण बेशुद्ध पडले. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
Shocking: सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Septic Tank Cleaning AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • सेफ्टिक टँक साफ करताना सात जणांचा मृत्यू

  • सुरूवातीला एक जण सेफ्टिक टँकमध्ये उतरला

  • त्याला वाचवण्यासाठी एक एक करत ७ जण खाली उतरले

  • विषारी वायूमुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

  • ३ जण या घटनेच जखमी झाले आहेत

बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. याठिकाणी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. सेफ्टिक टँक साफ करत असताना ही घटना घडली. गावामधील सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी एक तरुण खाली उतरला होता. पण तो बराच वेळ बाहेर न आल्यामुळे एकामागे एक करते ७ जण सेफ्टिक टँकमध्ये उतरले. सेफ्टिक टँकमधील विषारी वायुमुळे यामधील ४ तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला तर तिघांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील सराय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वरपूर गावात ही घटना घडली. या गावामध्ये राहणाऱ्या शिवजी साह यांच्या घरी १० वर्षांपूर्वी बांधलेल्या सेप्टिक टँकच्या साफसफाईचे काम सुरू होते. ही टाकी सुमारे १५ फूट खोल असल्याचे सांगितले जाते. ही सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी शिवजी यांचा मोठा नातू प्रियांशू सर्वप्रथम खाली उतरला. जवळपास १५ मिनिटे त्याचा आवाज ऐकू आला पण त्यानंतर त्याचा आवाज येत नव्हता. त्यामुळे कुटुंबीय घाबरले.

त्यानंतर त्याचे वडील आनंद टाकीत उतरले. पण त्यांचा देखील आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे एक एक करून आनंदचे दोन भाऊ पंकड आणि राहुल त्याला वाचवण्यासाठी खाली उतरले. ते देखील बाहेर आले नाहीत. त्यांना वाचवण्यासाठी आणखी काही जण काही उतरले. पण टाकीतील विषारी वायुमुळे सातही जण टाकीतच बेशुद्ध पडले. या घटनेची माहिती मिळतात संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झाले. पोलिस आणि अग्निशमन दलाला देखील घटनेची माहिती देण्यात आली.

Shocking: सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Shocking : परीक्षेला जाण्याआधी १० वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, पेपरला जाणार इतक्यात भयंकर घडलं

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सातही जणांना टाकीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी एकाच कुटुंबातील चार जणांना मृत घोषित केले. तर इतर ३ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. राहुल कुमार (२४ वर्षे), पंकज कुमार, आनंद कुमार (४६ वर्षे) आणि त्यांचा मुलगा प्रियांशु कुमार (१८ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत.

Shocking: सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Shocking : बंद खोलीत नको त्या अवस्थेत सापडले दोन महिला अन् दोन पुरुष; पोलिसांनी दार उघडताच दृश्य बघून हादरलेच

मृतांपैकी राहुलचे लग्न ५ दिवसांपूर्वी झाले होते. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे साह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासातून चौघांचा मृत्यू टाकीतील विषारी वायूमुळे झाल्याचे समोर आले.

Shocking: सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Shocking : "...तो तुझा मामा आहे" शेजारच्या तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं; मुलीला मांडीवर बसवलं अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com