Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली

Uttarakhand Election Result: उत्तराखंडमध्ये दोन नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली
Uttarakhand Election Result:Saam Tv
Published On: 
  • उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची चिंता वाढली

  • २ नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय

  • काँग्रेसला भाजपचा पराभव करण्यात यश

  • काँग्रेस आमदारासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव करत विजय मिळवला. या विजयामुळे काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठं यश मिळाले. हा निकाल भाजपसाठी निराशाजनक आहे. काँग्रेसने उधम सिंग नगर जिल्ह्यातील किच्छा आणि सिराउली कलान या दोन्ही नगरपरिषदेच्या जागा जिंकल्या. किच्छाचे आमदार आणि काँग्रेस नेते टिळक राज बेहाद यांच्यासाठी हा एक मोठा विजय मानला जात आहे.

किच्छा आणि सिराउली कलान या दोन नगरपरिषदेसाठी मतदान झाल्यानंतर टिळक राज बेहाद यांनी भाजपचे माजी आमदार राजेश शुक्ला यांच्याशी वाद घालता होता आणि ते ढसाढसा रडत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बेहाद आनंदोत्सव साजरा करत असल्याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या विजयाकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठे संकेत असल्याचे सांगितले आहे.

Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली
Election Result : बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, त्यातही काँग्रेसचा दारूण पराभव, फक्त २ जागा जिंकल्या

उधम सिंग नगर जिल्ह्यातील सिराउली कलानमधून रशिदा बेगम यांनी फरहीन जहाँ यांचा १७६३ मतांनी पराभव केला. भाजपने याठिकाणी कुणालाही उमेदवारी दिली नव्हती. फरहीन जहाँ अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होत्या. किच्छा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेश प्रताप सिंह यांनी भाजपचे उमेदवार संदीप अरोरा उर्फ ​​सोनू यांचा ६२०० मतांच्या मोठ्या फरकांनी पराभव केला. रुद्रपूरच्या किच्छा नगरपरिषदे निवडणुकीत अध्यक्षपदावर काँग्रेसचे उमेदवार राजेश प्रताप सिंह यांनी मोठा विजय मिळवला. राजेश प्रताप सिंह यांनी भाजपचे उमेदवार संदीप अरोरा यांचा ६२०० मतांच्या फरकांनी पराभव केला.

Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली
Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

राजेश प्रताप सिंह यांनी आपला विजय हा किच्छाच्या जनतेचा, तसेच आमदार टिळक राज बेहद यांचा विजय असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, किच्छा येथील नवीन मंडी संकुलात मतमोजणी झाली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान हे प्रकरण हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. दोन्ही नगरपरिषदेसाठी २२ सप्टेंबर रोजी निवडणुका झाल्या होत्या.

या निवडणुकीच्या मतदानावेळी मतदान केंद्रांवर गोंधळ आणि तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी देखील गोंधळ झाला होता. काँग्रेसचे खासदार टिळक राज बेहद आणि भाजपचे माजी आमदार राजेश शुक्ला यांच्यात वाद झाला होता. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली
MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com