Siddhi Hande
आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला तीन ते चार मत देणे अपेक्षित आहे.
नगरपरिषदेची निवडणुक ही बहुसदस्यीय पद्धतीने होते. त्यामुळे तुम्हाला सदस्य आणि नगराध्यक्ष पदांसाठी मतदान करायचे आहे.
दोन जागा म्हणजे अ आणि ब असलेल्या प्रभागात तीन मत देणे गरजेचे आहे. दोन मते सदस्यांना तर एक मत अध्यक्ष पदासाठी द्यावे लागणार आहे.
तीन जागा म्हणजेच अ, ब आणि क असलेल्या संघात एका मतदाराने चार मते देणे अपेक्षित आहेत. तीन मते सदस्यांसाठी आणि १ मत नगराध्यक्ष पदांसाठी आहे.
अध्यक्षपदासाठी मतपत्रिकेचा रंग हा फिका गुलाबी असणार आहे. त्यावर तुम्हाला अध्यक्ष पदांच्या उमेदवारांची नावे दिसतील.
सदस्य पदांसाठी 'अ'जागेसाठी पांढरा आणि 'ब'जागेसाठी फिका निळा आणि 'क'जागेसाठी फिका पिवळा रंग असणार आहे.
नगरपंचायतीच्या एक सदस्यीय पद्धतीसाठी मतदारांना दोन मते देणे आवश्यक आहे. एक मत अध्यक्ष तर एक मत सदस्य पदासाठी द्यावे लागणार आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मतपत्रिकेचा रंगा फिका गुलाबी तर सदस्य पदासाठी मतपत्रिकेचा रंग पांढरा असणार आहे.