Samantha- Raj Wedding: समांथा रूथ प्रभू अन् राज यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

Sakshi Sunil Jadhav

समांथा रूथ प्रभू

नुकत्याच साऊथ फेम अभिनेत्रीने गुपचूप विवाह केला. सध्या सोशल मीडियावर हीची जोरदार चर्चा आहे. या अभिनेत्रीचे नाव समांथा रूथ प्रभू आहे. या अभिनेत्रीने दिग्दर्शक राज निदीमोरू सोबत Ling Bhairavi Temple मध्ये फक्त 30 अतिथींच्या उपस्थितीत विवाह केला.

Samantha- Raj Wedding

समंथाचा ब्राइडल लुक चर्चेत

सुत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्रीने पारंपरिक लाल रंगाची साडी परिधान केली होती. समारंभ साधा पण पारंपरिक ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. दिग्दर्शक राज यांनीही अतिशय साधा आणि शांत लूक निवडला होता.

Samantha- Raj Wedding

सोशल मीडियावर व्हायरल चर्चा

रविवार रात्रीपासून दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली. या पुर्वी समांथा वल्ड पिकलबॉल लीगमध्ये राज निदीमोरु यांची मैत्री चाहत्यांना पाहायला मिळाली होती. तेव्हापासून यांच्या चर्चांना उधाण आले होते.

Samantha- Raj Wedding

राजच्या एक्स-वाइफचा पोस्ट

दोघांच्या या चर्चेदरम्यान, राजची माजी पत्नी श्यामाली डे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की, "हताश लोग हताश करने वाले काम करते हैं." या पोस्टमुळे आणखी चर्चेला उधाण आले.

Samantha Ruth Prabhu wedding

2024 पासून दोघांच्या मैत्रीबद्दल चर्चा

समंथा आणि राज यांच्यातील बॉंडींग चर्चा 2024 पासून सुरू झाली. अभिनेत्रीने त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच दोघांच्या नात्याबाबत अफवा वाढल्या.

Raj Nidimoru marriage

'द फॅमिली मॅन 2' सेटवर पहिली भेट

दोघांची मैत्री ‘द फॅमिली मॅन 2’ (2021) च्या शूटिंगदरम्यान झाली. त्यानंतर हनी बनी आणि आगामी Rakt Brahmand: The Bloody Kingdom या प्रोजेक्ट्सवरही त्यांची जोडी एकत्र काम करत आहे.

Samantha secret wedding

समंथाचे पूर्वीचे लग्न

समंथा पूर्वी अभिनेता नागा चैतन्य सोबत विवाहबद्ध झाली होती. चार वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यने नंतर अभिनेत्री सोभिता धूलिपाला सोबत लग्न केले.

Samantha marriage truth

राज निदीमोर्गुचाही घटस्फोट 2022 मध्ये

राज आणि त्यांची पत्नी श्यामाली डे यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे. त्यानंतरच राज समंथा यांच्यातील जवळीक वाढली असल्याचे काही स्रोत सांगतात.

Samantha marriage truth

NEXT: Anti Aging Diet: टवटवीत, मऊ आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी कोणता आहार घ्यावा?

Anti Aging Diet | GOOGLE
येथे क्लिक करा