Sakshi Sunil Jadhav
कोलेजन हे त्वचेला टवटवीत, मऊ आणि तरुण ठेवणारे महत्त्वाचे प्रोटीन आहे. वय वाढल्यावर शरीरातील कोलेजनची पातळी कमी होते आणि सुरकुत्या, त्वचा सैल पडणे, कोरडेपणा अशा समस्या वाढतात.
राताळ्यात बीटा-कॅरोटीन मुबलक असते. जे व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होऊन त्वचेचा टोन सुधारते आणि कोलेजन निर्मिती वाढवते.
लाल ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते. हे कोलेजन सिंथेसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
पालकामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेची लवचिकता वाढवतात आणि ती मऊ ठेवतात.
व्हिटॅमिन E ने समृद्ध असलेले बदाम त्वचेचे संरक्षण करतात. कोरडेपणा कमी करतात आणि कोलेजनला सपोर्ट करतात.
टोमॅटोतील लाइकोपीन सूर्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान कमी करते आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा उजळ आणि टवटवीत होते.
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीजमध्ये व्हिटॅमिन C व अँटिऑक्सिडंट्स असतात जे कोलेजन तुटण्याची प्रक्रिया मंद करतात.
ओमेगा-3 फॅटी अॅसिडने समृद्ध चिया सीड्स त्वचेला हायड्रेशन देतात आणि नैसर्गिक कोलेजन वाढवतात.
बीन्स आणि कडधान्ये हे वनस्पती-आधारित प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत, जे कोलेजन तयार करणाऱ्या अमिनो अॅसिडसाठी अत्यंत आवश्यक असतात.