Sakshi Sunil Jadhav
भारताचे संविधान निर्माता म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ सामाजिक सुधारक नव्हते, तर आधुनिक भारताचे खरे तांत्रिक राष्ट्रनिर्माते होते. वीजनिर्मिती, जलसंपदा, सिंचन, धरणे आणि नदी खोरे विकास या क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया मानले जाते.
ज्या काळात पायाभूत सुविधा, वीज आणि जलव्यवस्थापन या क्षेत्रात भारत अपुरा होता, त्या काळात आंबेडकरांनी एक वैज्ञानिक आणि दूरदृष्टीचा मार्ग सुचवला. पुढे आपण सोप्या भाषेत याबद्दल जाणून घेणार आहोत.
आंबेडकरांनी वीजनिर्मिती, वितरण आणि औद्योगिक वीजपुरवठ्याचे एकत्रित राष्ट्रीय धोरण मांडले. हे भारतातील पहिल्या इलेक्ट्रिसिटी प्लॅनिंगचे आधारस्तंभ ठरले.
देशातील जलविद्युत प्रकल्पांचा पाया रचण्यामध्ये त्यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. "जलविद्युत हे औद्योगिक भारताचे भविष्य आहे." हा त्यांचा दृष्टीकोन होता.
दक्षिण आशियातील पहिल्या बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पाची कल्पना आंबेडकरांची होती. पूरनियंत्रण, सिंचन आणि वीज उत्पादनाची ही भारताची पहिली मोठी एकत्रित योजना होती.
जगातील सर्वात लांब मातीच्या धरणांपैकी एक असलेल्या हिराकूड प्रकल्पाचा पाया त्यांच्या तांत्रिक विचारांतून निर्माण झाला आहे.
आंबेडकरांनी पाणी हे केंद्र सरकारच्या अधिकारात यावे आणि त्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन व्हावे यासाठी ठाम भूमिका घेतली. ही भूमिका आजच्या जलनीतीची आधारस्तंभ बनली आहे.
सिंचन, शेती, दुष्काळ नियंत्रण, पूरनियंत्रण आणि जलविद्युत यासाठी एकत्रित नदी खोरे विकास ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी अत्यंत महत्वाची भूमिका ठरली आहे.
सोन नदी, कृष्णा–गोदावरी योजनांची धोरणे या प्रकल्पांना त्यांनी वैज्ञानिक आधार दिला. प्रादेशिक विकासासाठी पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी प्रथम सिद्ध केले.
आंबेडकरांचे विधान होते की, औद्योगिक विकास वीज आणि पाण्यावर अवलंबून असतो. या दोघांशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. ही दृष्टी भारताच्या पुढील औद्योगिक क्रांतीचे बळ ठरली. आज उभारलेली धरणे, जलविद्युत प्रकल्प, सिंचन योजना आणि नदी विकास मॉडेल्स यांचा मूळ पाया आंबेडकरांच्या विचारांतूनच आकाराला आला.