मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal District Central Cooperative Bank Election: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. आर्णी तालुका गटातील शिंदेसेनेचे नेते अनिल आडे यांचे नामनिर्देशन पत्र न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले.
YAVATMAL BANK ELECTION
YAVATMAL BANK ELECTIONsaam tv
Published On: 

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. आर्णी तालुका गटातील महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल आडे यांचे नामनिर्देशन पत्र न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहे.

YAVATMAL BANK ELECTION
Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

अनिल आडे हे आर्णी तालुक्यातील एका सहकारी संस्थेचे संचालक असून, दुसऱ्या एका सोसायटीतून प्रतिनिधी असल्याचा मुद्दा काँग्रेसचे मनीष पाटील यांनी उपस्थित केला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पात्रतेच्या निकषांचा आधार घेत पाटील यांनी आडे यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती.

YAVATMAL BANK ELECTION
Vidhan Parishad Election: महायुतीनं उमेदवारी नाही दिली तर आम्ही देऊ; मंगेश चिवटेंना कोणी दिली ऑफर?

मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनीष पाटील यांची हरकत फेटाळून लावत अनिल आडे यांचे नामनिर्देशन पत्र कायम ठेवले होते. त्यामुळे आडे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या निर्णयाविरोधात मनीष पाटील यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयात झालेल्या सुनावणीत पाटील यांची हरकत ग्राह्य धरण्यात आली.

YAVATMAL BANK ELECTION
Maharashtra Rain: राज्यात ऊन-पावसाचा खेळ! परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ७ जिल्ह्यांना इशारा

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल आडे यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी तालुका गटातील महायुतीच्या राजकीय समीकरणाला मोठा धक्का बसला असून, या निर्णयाचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com