Delhi Chief Minister Rekha Gupta announces free bus travel for the transgender community in Delhi government buses.
Delhi Chief Minister Rekha Gupta announces free bus travel for the transgender community in Delhi government buses.Saam Tv

सरकारी बसमध्ये तृतीयपंथींना मोफत प्रवास, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Free Bus Travel For Transgender Community In Delhi: सरकारने तृतीयपंथी समुदायासाठी मोठा निर्णय घेत सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या या निर्णयामुळे तृतीयपंथी नागरिकांना सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होणार आहे.
Published on

दिल्ली सरकारने तृतीयपंथींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारने दिल्ली परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या बसेसमध्ये तृतीयपंथींना मोफत प्रवास देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर दिल्लीत राहणाऱ्या तृतीयपंथींना आता सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येईल.

Delhi Chief Minister Rekha Gupta announces free bus travel for the transgender community in Delhi government buses.
Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

महिलांना जशी मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते, त्याच धर्तीवर ही सेवा तृतीयपंथींसाठीही लागू करण्यात येणार आहे. सरकारच्या मते, या निर्णयामागचा मुख्य उद्देश तृतीयपंथी समुदायाला सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे त्यांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर दैनंदिन गरजांसाठी प्रवास करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Delhi Chief Minister Rekha Gupta announces free bus travel for the transgender community in Delhi government buses.
MP News : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलीचं निधन, कुटुंबासह पक्षावर शोककळा

याबाबत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, आमच्या सरकारचे उद्दिष्ट अशी दिल्ली उभारण्याचे आहे, जिथे प्रत्येक नागरिकाला सन्मानासह संधी आणि सार्वजनिक सेवा समानपणे मिळतील. या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये समता आणि सामाजिक सलोखा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, तृतीयपंथी समुदायासाठी हा निर्णय दिल्लीत मोठा दिलासा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com