Viral Video: 'दिल संभल जा जरा...';पोलिसाचा आवाज ऐकून चकीत व्हाल!

काही जणांचे अनोखं टॅलेंटचं सादरीकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
Trending Policemen Singing Video:
Trending Policemen Singing Video: Saam tv
Published On: 

Trending Policemen Singing Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू शकता. सोशल मीडियावर अनेक डान्स आणि गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही जणांचे अनोखं टॅलेंटचं सादरीकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . (Latest Marathi News)

सोशल मीडियावर पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने गोड आवाजात कार पार्किंगमध्ये गाणं गायलं आहे. पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस कर्मचारी हा दिल्ली पोलीस दलात कार्यरत आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Trending Policemen Singing Video:
Viral Video: काळजाचा ठोका चुकवणारा बैलगाडा शर्यतीचा थरार; याचि देही, याचि डोळा....नागरिकांनी प्रसंग पाहिला, व्हिडिओ व्हायरल

या पोलीस कर्मचाऱ्याने 'दिल संभल जा जरा...' हे गाणं गायलं आहे. पोलिसाने गोड आवाजात गायलेलं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोलिसाच्या गाण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरलं झालं आहे.

दरम्यान, व्हिडिओ पाहून अनेकांना वाटत आहे की, पोलीस कर्मचारी चुकीच्या क्षेत्रात आहे. व्यक्तीने गरजेमुळे कोणतंही क्षेत्र स्वीकारलं तरी त्याच्यातील टॅलेंट माणूस कधीही विसरत नाही. या पोलीस कर्मचाऱ्याने गाणं गाऊन नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

हा सुंदर व्हिडिओ इन्स्टाग्रावर musicalchamber नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. पोलिसाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूपच भावला आहे . गेल्या महिन्यात १२ मार्च रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाख जणांहून अधिक जणांनी लाईक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.