Viral Video: काळजाचा ठोका चुकवणारा बैलगाडा शर्यतीचा थरार; याचि देही, याचि डोळा....नागरिकांनी प्रसंग पाहिला, व्हिडिओ व्हायरल

घोडेस्वाराकडून घोडीला दिशा न मिळाल्याने बैलजोडी थेट घोडेस्वराच्या अंगावर गेली, मात्र यावेळी मोठा अनर्थ टळला.
Bull Cart Race Viral Video
Bull Cart Race Viral Video Saam tv
Published On

Bullock Cart Race: काळजाचा ठोका चुकवणारा हा थरार बैलगाडा घाटात घडला आहे. ही घटना नागरिकांनी डोळ्यांनी अनुभवला आहे. यावेळी बैलगाडी घाटात भिर्रर्र ची आरोळी ठोकताच चावरंकरी धुकरंकरी घोडीच्या दिशेने धावले. मात्र, याच दरम्यान घोडेस्वाराकडून घोडीला दिशा न मिळाल्याने बैलजोडी थेट घोडेस्वराच्या अंगावर गेली, मात्र यावेळी मोठा अनर्थ टळला . (Latest Marathi News)

गावगाड्यावरच्या जत्रा यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीच्या भिर्रर्र...र्र च्या शर्यतीत तरुणाईसह नागरिक शौकीन बैलगाडा मालक बेफान झालेय. अशात बैलगाडा घाटातले अपघातही दिवसेंदिवस वाढत आहेत.

शिरुरच्या तळेगाव ढमढेरे येथे बैलगाडा घाटात बैलाने तरुणाच्या पोटात शिंग खुपसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याचदरम्यान, बैलगाडा घाटात भिर्रर्रची बारी सुटली आणि बैल थेट घोडेस्वाराच्या अंगावरच गेल्याची घटना घडलीय. हा अपघाताचा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

Bull Cart Race Viral Video
Viral Video : कृष्णा नदीपात्रात बैल आणि मगरीचा थरार, अखेर बैलाची सुटका

तसं बैल आणि शेतकऱ्यांचं नातं जिव्हाळ्याचे..शेतकरी जसं बैलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपतो आणि संभाळही करतो. त्याची कृतज्ञता म्हणून बैलही शेतकऱ्यांसाठी मेहनतही घेतो आणि आपल्या मालकाच्या नावासाठी लढतोच. पण अपघाती दुदैवी घटनेत ही मालकाच्या संरक्षणासाठी तसाच तत्पर रहातो. याचंच उदाहरण या बैलगाडा घाटात पहायला मिळाले.

Bull Cart Race Viral Video
Navi Mumbai MNS News: राज ठाकरेंना मोठा धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

काही दिवसांपूर्वी झाला एका मृत्यू

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान दुर्दैवी घटना घडली होती. एका 35 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला होता. वृषाल बाळासाहेब राऊत असं मृत व्यक्तीचे नाव होते.

बैलाचे शिंग पोटात घुसल्याने वृषालचा मृत्यू झाला होता. बैलगाडा शर्यतीसाठी बैल घेऊन जात असताना बैल गाडीतून खाली उतरवत असताना बैलाने वृषालला शिंगावरती घेतल्याने शिंग पोटात घुसून वृषालचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली गेली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com