Navi Mumbai MNS News: राज ठाकरेंना मोठा धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

Political News : मनसेचे नवी मुंबई उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेची (शिंदे गट) वाट धरली आहे.
Raj Thackeray on Pune By Election 2023
Raj Thackeray on Pune By Election 2023Saam Tv

MNS Navi Mumbai News: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे नवी मुंबईतील मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसेचे नवी मुंबई उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेची (शिंदे गट) वाट धरली आहे.

गेल्या महिन्यापासून प्रसाद घोरपडे पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे नाराज होते. या नाराजीतून त्यांनी दीड महिन्यांपूर्वीच आपल्या उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पदाचा राजीनामा देताना प्रसाद घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  (Latest News Update)

Raj Thackeray on Pune By Election 2023
Saamana Editorial On Modi Government : प्रिय बाबासाहेब, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय? सामनातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray on Pune By Election 2023
Narayan Rane On Aditya Thackeray: 'कोण आदित्य ठाकरे? बालिश आहे तो', नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला!

गजनान काळे हे धमकी देत असल्याचा आरोप करत प्रसाद घोरपडे यांनी उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. पदांचा राजीनामा दिला असला तरी आपण पक्षातच राहून काम करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. मात्र त्यांनी गजानन काळे यांच्यावर केलेल्या आरोपांची कोणतीही दखल पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आली नाही. तसेच पक्षात राहण्यासाठी त्यांची समजूतही काढण्यात आली नाही. (Political News)

अखेर या नाराजीतून घोरपडे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. प्रसाद घोरपडे यांनी आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाकडून घोरपडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com