Narayan Rane On Aditya Thackeray: 'कोण आदित्य ठाकरे? बालिश आहे तो', नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला!

Aditya Thackeray: हैदराबाद येथे एका मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी हे धक्कादायक विधान केले होते.
Narayan Rane On Aditya Thackeray:
Narayan Rane On Aditya Thackeray:Saam Tv

Mumbai News: ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते आणि भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

अशामध्ये नारायण राणे यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'कोण आदित्य ठाकरे? बालिश आहे तो.', या शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंना फटकारले आहे.

Narayan Rane On Aditya Thackeray:
Cm Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

'सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. आपण भाजपसोबत जाऊया नाही तर मला अटक होईल. असे ते घरी येऊन म्हणाले होते.', असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. हैदराबाद येथे एका मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी हे धक्कादायक विधान केले होते.

त्यांच्या या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांचे समर्थन केले. 'आदित्य ठाकरे हे सत्यच बोलले.',असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना बालिश म्हणत टीका केली.

Narayan Rane On Aditya Thackeray:
Pankaja Munde: राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापलं; पंकजा मुंडे यांचा महंतांना टोला

नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, 'आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहेत तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो. काहीही बोलतो.' , अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

तसंच, 'एकनाथ शिंदे भाजपसोबत नाही गेले. ते शिवसेना पक्ष घेऊन आले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. तुम्ही आता शाळेतील मुलांचेही प्रश्न विचाराल का? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

Narayan Rane On Aditya Thackeray:
Congress leader on mangal prabhat lodha: मंगल प्रभात लोढा मंत्री म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक; काँग्रेस नेत्याची सडकून टीका

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'तो (आदित्य ठाकरे) अजून लहान आहे.' अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी देखील आदित्य ठाकरेंना फटकारले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com