

दिल्लीतील सीएनजी पंपावर मोठा स्फोट झाला. टिकरी कला परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी भरताना ही दुर्घटना घडली. घटनेनंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यात सहा जण जखमी झाले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील तिघांचा मृत्यू झाला.
दिल्लीच्या अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी दिल्लीतील टिकरी कला परिसरात एका सीएनजी पंपावर ट्रकमध्ये गॅस भरताना टाकीचा स्फोट झाला. अचानक मोठा आवाज झाल्यानं सर्वत्र गोंधळ उडाला. या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्या सहा जखमी व्यक्तींपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
सीएनजी पंपावर झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाला दुपारी ३.३७ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर सहा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, तिघांचा मृत्यू झाला आहे.
स्फोट कशामुळं झाला, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे. स्फोटाच्या आवाजानं परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या वर्षी एप्रिलमध्येही दिल्लीच्या द्वारका परिसरातील सीएनजी पंपावर ट्रकला सिलिंडर फुटला होता. त्या दुर्घटनेत चार जण जखमी झाले होते. द्वारकाच्या नजफगड-मित्राऊं रोडवरील सीएनजी पंपावर ही दुर्घटना घडली होती. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंपावरील कर्मचारी एका ट्रकमध्ये सीएनजी भरत होता. त्यावेळीच सिलिंडरचा स्फोट झाला होता. जखमींमध्ये तिघे पंपावरील कर्मचारी होते. दरम्यान, सीएनजी पंपावर गॅस भरताना सतर्क राहावे. आवश्यक मानकांचे पालन करावे, असे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.