PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

PNG connection new government scheme from September 1 : घराघरांत पीएनजी पोहोचवण्याच्या दृष्टीनं सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. गॅस कंपन्यांना तगडा इन्सेन्टिव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. ही नवी योजना १ सप्टेंबरपासून लागू होईल.
PNG कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, नवी योजना १ सप्टेंबरपासून लागू होणार
PNG Connection Updatesaam tv
Published On

LPG गॅस सिलिंडरऐवजी देशभरातील घराघरांत पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील योजनेला गती देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून नव्याने घरगुती पीएनजी कनेक्शन वाढवण्यासाठी सिटी गॅस कंपन्यांना अतिरिक्त २०० SCM स्वस्त घरगुती नैसर्गिक गॅस देण्यात येणार आहे. नवे कनेक्शन वाढवण्यासोबतच आधीपासूनच जोडणी झालेले निष्क्रिय कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचाही सरकारचा मानस आहे.

सरकारची योजना काय?

केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार, योग्य सिटी गॅस डिस्ट्रिब्युटर (CGD) कंपन्यांना त्यांच्या परिसरात ठरवून दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक नवे देयके असलेले घरगुती पीएनजी कनेक्शन (PNG Connection) दिल्यास प्रत्येक कनेक्शनसाठी अतिरिक्त २०० मानके घन मीटर (SCM) घरगुती गॅस देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. ही योजना कंपन्यांसाठी फायदेशीर असून, १ सप्टेंबरपासून ही योजना लागू होईल. ही योजना दोन टप्प्यांत लागू करण्यात येईल. प्रत्येक टप्प्याचा कालावधी सहा महिन्यांचा असेल. अतिरिक्त देण्यात येणारे गॅस स्वस्त असेल.

कंपन्यांना मोठा आर्थिक दिलासा

वृत्तानुसार, अतिरिक्त मिळणाऱ्या स्वस्तातल्या गॅसच्या माध्यमातून शहरी गॅस वितरक कंपन्या महागड्या एलएनजी (LNG) ची खरेदी काही प्रमाणात कमी करू शकतील. यामुळे कंपन्यांच्या एकूण गॅस खरेदीत घट होईल. घरगुती पीएनजी नेटवर्क वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर होईल. सरकारच्या अंदाजानुसार, या योजनेच्या माध्यमातून घरगुती पीएनजी कनेक्शनवर केलेली गुंतवणूक वसूल करण्यासाठी लागणारा कालावधी १० वर्षांवरून कमी होऊन तो जवळपास ३ वर्षांवर येईल.

देशात १.७४ कोटींहून अधिक पीएनजी कनेक्शन

भारतात सध्याच्या घडीला जवळपास १.७४ कोटी घरगुती पीएनजी कनेक्शन आहेत. सरकार पाईपद्वारे पुरवले जाणारे गॅस एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत अधिक सोयीचं करण्यास प्रोत्साहन देत आहे. पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना गॅस सिलिंडरसारखं वारंवार बुकिंग करावं लागत नाही किंवा डिलिव्हरीची वाट बघावी लागत नाही. पाईपद्वारे गॅस पुरवठा सुरुच असतो आणि मीटरप्रमाणे बिल अदा करावं लागतं.

PNG कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, नवी योजना १ सप्टेंबरपासून लागू होणार
LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?

LPG वरून PNG कनेक्शन वाढवण्यावर भर

पश्चिम आशियातील युद्धसंकट गडद झाल्यानंतर त्या दरम्यानच्या कालावधीत एलपीजी पुरवठ्यात आव्हान निर्माण झालं होतं. त्यानंतर सरकारनं पीएनजी नेटवर्क वाढवण्यावर भर दिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्चपासून आतापर्यंत ५ लाखांहून अधिक पीएनजी कनेक्शन देण्यात आले आहेत. तर ५.७ लाखांहून अधिक ग्राहकांनी नव्या कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे. घरगुती एलपीजी कनेक्शन सरेंडर करून पीएनजी जोडणी घ्यावी, असे आवाहनही सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच PNG Drive 2.0 अंतर्गत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या सोसायट्यांमध्ये रहिवासी एलपीजी सिलिंडरचा वापर करत आहेत, त्यांनी पीएनजी कनेक्शन घ्यावे, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

PNG कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, नवी योजना १ सप्टेंबरपासून लागू होणार
LPG Gas KYC Update : १० दिवसात e-KYC करा, अन्यथा सिलिंडर दुपट्टी दराने करावा लागेल खरेदी, वाचा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com