LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?

10 LPG gas cylinder: एलपीजी गॅस सिलिंडरबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आता १९ किलोऐवजी १० किलोचा गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?
LPG gas cylinder pricegoogle
Published On
  • एलपीजी सिलिंडरच्या नियमात बदल

  • यापुढे मिळणार १० किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर

  • १९ किलोच्या गॅस सिलिंडरऐवजी हलक्या वजनाचा सिलिंडर उपलब्ध करून दिला जाणार

  • छोट्या व्यावसायिकांना होणार फायदा

देशामध्ये लवकरच छोटे व्यवसायिक, स्ट्रीट फूड विक्रेते, विद्यार्थी, भाड्याने घर घेऊन राहणारे, प्रवासी आणि मजूर यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. या सर्वांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलिंडरचा वापर पूर्वीपेक्षा आणखी सोपा होऊ शकतो. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या आता घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही गॅस सिलिंडरच्या ग्राहकांसाठी १० किलो वजनाचे हलके कंपोझिट एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत. जर केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर १९ किलो वजनाच्या जड व्यावसायिक सिलिंडर उचलण्यात आणि हाताळण्यात येणाऱ्या अडचणींपासून ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

व्यावसायिक एलपीजी सिंलिंडर १९ किलो, ५ किलो आणि २ किलो वजनांमध्ये उपलब्ध होतात. १९ किलोचा सिलिंडर आकाराने खूप मोठा आणि जड असल्यामुळे त्याची वाहतूक करणे अवघड जाते. यामुळे छोटे कॅफे, चहाची दुकानं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, रस्त्यावरील विक्रेते आणि भाड्याने राहणारे नागरिक बऱ्याच काळापासून हलक्या आणि हाताळण्यास सोयीस्कर असणाऱ्या सिलिंडरची मागणी करत आहेत. या ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊनच तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी १० किलो वजनाचा संयुक्त सिलिंडर आणण्याचा विचार करत आहेत.

LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?
LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, १८३ रुपयांनी स्वस्त झाला गॅस सिलिंडर

१० किलोच्या सिलिंडरचा फायदा काय?

१० किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर हा उच्च -घनता पॉलीथिलीन म्हणजे एचडीपीईवर आधारीत प्रगत संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला आहे. या सिलिंडरचा फायदा म्हणजे पारंपारिक स्टीलच्या सिलिंडरपेक्षा हा सिलिंडर जवळपास ५० टक्के हलका असेल. या हलक्या वजनाच्या सिलिंडर हाताळणे सोपे असेल. हा सिलिंडर पायऱ्यांवरून वर-खाली नेणे, छोट्या दुकानात ठेवणे आणि दैनंदिन वापरासाठी सोपा असेल. त्याच्या अर्धपारदर्शक बाह्य अवरणामुळे अतिरिक्त गेजशिवाय शिल्लक गॅस सहज पाहया येतो. यामुळे ग्राहकांना तो रिफिल करणं खूपच सोपे होईल.

LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?
LPG Price Today : गॅस सिलिंडर स्वस्त झाला की महाग? एका क्लिकवर पाहा आजचा भाव

१० किलोच्या सिंलिंडरचे कंपनीनुसार नावं काय?

सध्या हे १० किलो वजनाचे कंपोझिट सिलिंडर घरगुती ग्राहकांना मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. एचपीसीएल त्याची विक्री एचपी गॅस ओजस या नावाने करते. इंडियन ऑइल त्याची विक्री इंडेन एक्स्ट्रालाइट या नावाने आणि बीपीसीएल त्याची विक्री भारतगॅस लाइट या नावाने करते. तेल कंपन्या आता हे तंत्रज्ञान व्यावसायिक ग्राहकांपर्यंतही विस्तारण्याचा प्लान करत आहे. हे सिलिंडर गॅस एजन्सी आणि निवडक रिटेल आउटलेट्सवर व्यावसायिक एलपीजीच्या समान दरात विकले जाऊ शकतात.

LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?
LPG News: मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय

या सिलेंडरची किंमत किती?

१० किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, दिल्लीमध्ये सध्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १९४२ आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,९३० आहे. ५ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ८०८.५० रुपये इतकी आहे. १० किलोच्या व्यावसायिक कंपोझिट सिलेंडरची किंमत अद्याप निश्चित झालेली नसली तरी ती ५ किलो आणि १९ किलोच्या सिलेंडरच्या किमतीच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?
LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, १८३ रुपयांनी स्वस्त झाला गॅस सिलिंडर

सर्वाधिक फायदा कोणाला होईल?

या १० किलोच्या गॅस सिलिंडरची योजना जर सुरू झाली तर मर्यादित गॅसची गरज असलेल्या छोट्या व्यवसायांना याचा सर्वाधिक फायदा होईल. त्यांना यापुढे जड सिलिंडर वाहून नेण्याचा त्रास होणार नाही आणि गॅस कधी संपत आहे हे त्यांना सहजपणे तपासणं सोपं राहिल. तसंच, लहान शहरे आणि महानगरांमध्ये भाड्याने राहणारे विद्यार्थी, नोकरदार आणि स्थलांतरित मजूर यांनाही या गॅस सिलिंडरचा फायदा होईल.

LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?
LPG Connection : घर बदलंय तर LPG कनेक्शन ट्रान्सफर कसं होणार? जाणून घ्या 5 नियम नाहीतर कनेक्शन होईल बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com