ठाण्यात थरकाप! घोडबंदर रोडवर रिक्षावर गॅस टँकर उलटला; दोघांचा जागीच मृत्यू, पावसात वाहतूक विस्कळीत

Ghodbunder Road Accident death : ठाण्यातील घोडबंदर रोडवर मुसळधार पावसात गॅस टँकर रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
Ghodbunder Road Accident
Ghodbunder Road Accident
Published On

ठाण्यातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवर भरपावसात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या एका गॅस टँकर थेट धावत्या ऑटोरिक्षावर उलटला. या भीषण अपघातात ऑटोरिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

TOI ने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घोडबंदर महामार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आनंद नगरमधील कावेसर येथील डी-मार्टजवळ अपघात झाला. ऑटोरिक्षा नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन जात होती, त्यावेळी अचानक गॅस टँकर रिक्षावरच कोसळला. टँकरचे वजन एवढे प्रचंड होते की, ऑटोरिक्षाचा खाली पूर्णपणे चक्काचूर झाला. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला की टँकरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Ghodbunder Road Accident
मुंबईत झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, महापालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी

मृतकांची ओळख पटली; एक जण गंभीर

या अपघाताच्या वेळी ऑटोरिक्षामध्ये चालकासह दोन प्रवासी प्रवास करत होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली आहे. ऑटोरिक्षा चालक दशरत पवार (वय- रा. कळवा) आणि प्रवासी मोहम्मद अमीन (मूळचे उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले दुसरे प्रवासी अमजीत अन्सारी यांना स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने ओवाला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Ghodbunder Road Accident
Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

महामार्गावर वाहतूक कोंडी; क्रेनच्या मदतीने टँकर हटवला

या भीषण अपघातामुळे घोडबंदर महामार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी तातडीने रुग्णवाहिका अन् क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने रिक्षावर उलटलेला जड टँकर बाजूला केला आणि अपघातग्रस्त वाहन हटवून रस्ता मोकळा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com