July 1 new rules: पेट्रोल-डिझेलपासून ते एलपीजी सिलिंडरपर्यंत, आजपासून १० मोठे बदल; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

India new rules 2026: १ जुलै २०२६ पासून एलपीजी सिलिंडरचे दर, पेट्रोल-डिझेल, आधार अपडेट, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट शुल्क, रेल्वे नियम, आयटीआर आणि पीक विमा अभियानासह अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. जाणून घ्या प्रत्येक बदलाचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम.
July 1 new rules
July 1 new rulessaam tv
Published On

आजपासून जुलै महिन्याची सुरुवात झाली असून त्यासोबतच देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर, बँकिंग व्यवहारांवर, सरकारी सेवांवर आणि आवश्यक कागदपत्रांशी संबंधित कामांवर होणार आहे.

1 जुलै 2026 पासून एलपीजी सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, आयकर रिटर्न (ITR), रेल्वे नियम आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नियम लागू झालेत. काही बदलांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असला, तरी काही गोष्टींसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेऊया.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त

जुलै महिन्याची सुरुवात ग्राहकांसाठी दिलासादायक ठरलीये. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 183.50 रुपयांची कपात करण्यात आलीये. इंडियन ऑईलच्या नव्या दरानुसार, आतापर्यंत 3,113.50 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता 2,930 रुपयांत उपलब्ध होणार आहे.

July 1 new rules
Road accident news: पहाटे अपघाताचा थरार! भरधाव बसची कारला धडक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना सध्या जुन्याच दराने सिलिंडर मिळणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर खासगी इंधन विक्रेता नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरातील नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झालंय.

पेट्रोल-डिझेलवरील मर्यादा हटवली

देशातील पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा आता पहिल्यासारखा झाल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील तात्पुरती मर्यादा हटवलीये. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर आता पूर्वीप्रमाणेच इंधन विक्री होईल.

July 1 new rules
Mumbai Local: मुंबईकरांचे हाल! पावसाचा फटका लोकलसेवेवर, मध्य - हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने

आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेट आता मोफत

1 जुलैपासून आधार कार्डधारकांसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी आधारमध्ये ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी 75 रुपये शुल्क आकारलं जात होतं. मात्र आता ही सुविधा पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.

ही सवलत फक्त नवीन Aadhaar App च्या माध्यमातून ई-मेल अपडेट करणाऱ्यांनाच मिळणार आहे. UIDAI ने नागरिकांना जुने mAadhaar App वापरण्याऐवजी नवीन Aadhaar App डाउनलोड करून त्याचाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

क्रेडिट कार्डचे नियम बदलले

1 जुलैपासून SBI आणि HDFCसह अनेक बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. SBI क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सची पद्धत बदलू शकते. तर HDFC क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना विमानतळावरील लाउंज सुविधा मिळवण्यासाठी ठरावीक खर्चाची अट पूर्ण करावी लागू शकते. म्हणजेच मागील तिमाहीत निश्चित रक्कम खर्च केल्यावरच ही सुविधा मिळू शकते.

पासपोर्ट बनवणं झालं महाग

1 जुलैपासून पासपोर्ट बनवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 36 पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी आधी 1,500 रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यासाठी 2,500 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे 36 पानांचा तत्काळ पासपोर्ट बनवण्यासाठी आता 5,000 रुपये खर्च येणार आहे.

60 पानांच्या पासपोर्टसाठी पूर्वी 2,000 रुपये शुल्क होते. आता ते वाढून 3,500 रुपये झाले आहे. तर तत्काळ सेवेद्वारे 60 पानांचा पासपोर्ट बनवायचा असल्यास 6,000 रुपये मोजावे लागतील.

July 1 new rules
Nagpur Crime: नागपूर हादरले! कौटुंबिक वाद टोकाला गेला, तिघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नवी ईव्ही पॉलिसी लागू

1 जुलैपासून देशाची राजधानी नवी दिल्ली येथे नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण लागू झालंय. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सवलती आणि अनुदान मिळणार आहे. सरकार पुढील चार वर्षांत या योजनेसाठी 7,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. हे धोरण 31 मार्च 2030 पर्यंत लागू राहणार आहे.

रेल्वेने नियम अधिक कडक केले

1 जुलैपासून भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियम अधिक कडक केलेत. तिकीट नसताना प्रवास करणाऱ्यांवरील दंड वाढवण्यात आला आहे. यापूर्वी अशा प्रवाशांकडून प्रवासाचे संपूर्ण भाडे आणि 250 रुपयांचा दंड घेतला जात होता. आता हा दंड वाढवून 500 रुपये करण्यात आला आहे.

ITR भरण्याची अंतिम मुदत

नवीन आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर रिटर्न भरल्यास दंड भरावा लागू शकतो. उशिरा ITR दाखल केल्यास 1,000 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

'पीक विमा महिना' अभियानाची सुरुवात

1 जुलैपासून देशभरात 'पीक विमा महिना' अभियान सुरू झालंय. हे अभियान 31 जुलैपर्यंत चालणार आहे. या मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी जोडणं हा आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी या अभियानाद्वारे जनजागृती आणि नोंदणीवर भर दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com