Sakshi Sunil Jadhav
देशभरात LPG ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये घर बदल्यानपासून ते पीएनडी कनेक्शन घेण्यापर्यंतचे नवे बदल तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
नवीन घरात जाण्याआधी तुमच्या एलपीजी वितरकाला याची माहिती द्या. कनेक्शन ट्रान्सफरसाठी आवळ्यक कर्ज आणि कागदपत्रे वेळेत जमा करा.
ओळखपत्र, नवीन पत्त्याचा पुरावा, गॅस कनेक्शन वाउचर आणि बुकींगची माहिती तयार ठेवा. यामुळे ट्रान्सफर प्रक्रिया वेगाने पूर्ण होते.
जर नवीन घर त्याच गॅस एजन्सीच्या सेवा क्षेत्रात असेल तर नवीन कनेक्शन घेण्याची गरज नाही. फक्त पत्ता अपडेट केल्यावर सिलेंडरची डिलिव्हरी सुरू राहते.
नवीन पत्ता दुसऱ्या वितरकाच्या क्षेत्रात असल्यावर जुन्या एजन्सीकडून ट्रान्सफर टर्मिनेशन वाउचर (TTV) घ्यावे लागते. याच्याच आधारावर नवीन एजन्सीकडून कनेक्शन मिळते.
तुम्हाला दुसऱ्या शहरात जाताना जुना सिलेंडर आणि रेग्युलेटर एजन्सीकडे परत करावा लागतो. त्यानंतर टर्मिनेशन वाउचर आणि सिक्युरिटी डिपॉझिटची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
नव्या शहरातल्या गॅस एजन्सीकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नवीन एलपीजी कनेक्शन दिले जाते.
सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांनंतर देशभरात लाखो नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आलेले आहेत. भविष्यात जास्तीत जास्त घरांना पीएनजी सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
एखादी माहिती वेळेत दिल्याने आणि कागदपत्रे जमा केल्याने गॅस पुरवठा जास्त तसाच सुरू राहतो. नियमांचं पालन केल्याने ग्राहकांना जास्त लवकर आणि संपूर्ण सेवा मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.