

LPG Gas Update : देशभरातले LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी सर्व घरगुती गॅस कनेक्शनधारकांना १५ ऑगस्टआधी e-KYC पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. ही प्रोसेस तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर ग्राहकांना घरगुती सिलेंडरऐवजी व्यावसायिक (Commercial) दराने गॅस सिलेंडर घ्याला लागू शकतो किंवा रिफिल बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.
गॅस कंपन्यांच्या म्हणण्यांनुसार, e-KYC चा उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणं, बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन थांबणे किंवा सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे सर्व वितरकांना १५ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांची ईकेवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बऱ्याच भागांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने ग्राहकांनी e-KYC केलेली नाही. त्यामुळे गॅस एजन्सींकडून फोन कॉल, एसएमएस आणि प्रत्यक्ष संपर्क करून ग्राहकांना प्रोसेस पूर्ण करण्याचे आवाहन केलं जात आहे. काही ग्राहकांच्या मोबाईलवर रिफिल बुकिंग ब्लॉक (LPG Refill Booking) होण्यासंदर्भातील संदेशही येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे.
ग्राहक आपल्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन किंवा संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेच्या मदतीने e-KYC पूर्ण करू शकतात. त्यासाठी ग्राहकांकडे आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी केली जाते. प्रोसेस पूर्ण झाल्यावर कनेक्शनची माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे सर्वांनी १५ ऑगस्टच्या आधी ईकेवायसी प्रोसेस पूर्ण करा असं आवाहन कंपन्या आणि वितरकाकंडून करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.