Farmers Protest: शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र; देशभरात करणार रेल रोको; कसं असेल ४ तासांचं नियोजन

Farmers Rail Roko Protest: शेतकरी आज देशव्यापी 'रेल रोको' आंदोलन करणार आहेत. तब्बल ४ तास हे आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Farmers Protest
Farmers ProtestYandex
Published On

Farmers Protest Latest Update

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा सर्व पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) कायदेशीर हमीसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांनी आज ‘रेल रोको’ आंदोलन पुकारलं (Farmers Protest Update) आहे. (Farmers Protest Latest Update)

शेतकरी तब्बल ४ तास रेल रोको आंदोलन (Farmers Protest) करणार आहेत. दरम्यान, किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वनसिंह पंढेर यांनी माध्यमांना सांगितलं की, आंदोलक शेतकरी फिरोजपूर, अमृतसर, रूपनगर, गुरुदासपूर जिल्ह्यांसह पंजाबमधील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर बसणार आहे. आज दुपारी १२ ते ४ या वेळेत हे आंदोलन केलं जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'रेल रोको'मध्ये कोण कोण सहभागी होणार?

शेतकऱ्यांचा हा दिल्ली मोर्चा १३ फेब्रुवारीपासून सुरू झाला. सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाणारा त्यांचा मोर्चा रोखल्यानंतर आंदोलक शेतकरी पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून (Rail Roko Protest) आहेत. शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी शनिवारी केंद्राने सर्व पिकांवर एमएसपीसाठी कायदेशीर हमी देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढू नये, असं आवाहन केलं आहे.

शेतकरी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज रेल रोको आंदोलनाच्या तयारीत आहेत. भारती किसान युनियन (एकता उग्रहण), भारती किसान युनियन आणि क्रांतीकारी किसान युनियन, संयुक्त किसान मोर्चाचा भाग असलेल्या शेतकरी संघटना देखील 'रेल रोको' आंदोलनात सहभागी होणार (Dehi Farmers Protest) आहेत.

Farmers Protest
Farmer News: ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली मार्च कधी सुरू झाला?

शेतकऱ्यांचा हा दिल्ली मोर्चा १३ फेब्रुवारीला सुरू झाला होता. सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाणारा त्यांचा मोर्चा रोखल्यानंतर आंदोलक शेतकरी पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून (Delhi Chalo March) आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा 'दिल्ली चलो' मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या

प्रमुख मागण्यांमध्ये किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा करणे, ही मागणी समाविष्ट आहे. एमएसपीसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन द्या. शेती कर्ज माफ करा. याशिवाय लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील पीडितांना न्याय देण्याची मागणी शेतकरी केंद्राकडे करत आहेत.

Farmers Protest
Farmer Protest 2024: बस, रेल्वे आणि विमानाने दिल्ली गाठणार शेतकरी, रेल रोको करत 'या' दिवशी करणार आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com