Farmer Protest 2024: बस, रेल्वे आणि विमानाने दिल्ली गाठणार शेतकरी, रेल रोको करत 'या' दिवशी करणार आंदोलन

Kisan Andolan 2024 : केंद्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकरी दिल्लीत येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
Farmer Protest 2024
Farmer Protest 2024Saam Tv
Published On

Farmer Protest 2024:

केंद्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकरी दिल्लीत येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल यांनी सांगितले आहे की, शेतकरी कोणत्या दिवशी दिल्लीकडे कूच करतील.

जगजीत सिंग डल्लेवाल म्हणाले की, 'आम्ही मागे हटलो नाही आणि आमची दिल्लीकडे कूच करण्याची योजना पूर्वीसारखीच आहे. दिल्लीच्या सीमेवर आमची ताकद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील शेतकरी ६ मार्चला दिल्लीत पोहोचणार आहेत. हे शेतकरी रेल्वे, बस आणि विमान प्रवासाने येतील. आम्हाला आंदोलन करू देतात की नाही ते पाहू. १० मार्च रोजी आम्ही देशभरात 'रेल रेको' आंदोलन करणार आहोत. दुपारी १२ ते ४ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Farmer Protest 2024
Chandrapur News: चंद्रपुरात 65724 रोपट्यांपासून केली ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

एमएसपीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. मात्र आता जगजित सिंग डल्लेवाल यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी शेतकरी नेते मनजीत सिंग राय आणि जसविंदर सिंग लोंगोवाल यांनी त्यांच्या मागण्यांबाबत 'दिल्ली चलो' आंदोलन तीव्र करण्याबाबत बोलले होते.  (Latest Marathi News)

शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांचा दिल्ली चलो मार्च १३ फेब्रुवारीला थांबवण्यात आला होता. तेव्हापासून खनौरी आणि शंभू सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. १४ मार्च रोजी दिल्लीत शेतकरी किसान महापंचायत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी सांगितले होते की, महापंचायतीत ४०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

Farmer Protest 2024
Samruddhi Mahamarg : मुंबईतून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहचता येणार; उद्या होणार समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण

दरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान शंभू सीमेवर पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये धक्काबुकी झाली होती. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. २०२०-२१ मध्येही केंद्र सरकारचे तीन कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com