समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं उद्या होणार लोकार्पण होणार आहे. एकूण 16 गावातून जाणारा हा मार्ग 24.872 किमी लांबीचा आहे. प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च एकूण 1,078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 किमी पैकी आता एकूण 625 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहचता येणार आहे. शेतकऱ्यांनाही मुंबईला जलदगतीने शेतमाल नेता येणार आहे.
भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं उद्या सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारही उपस्थित असणार आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भरवीर – इगतपुरी पर्यंतच्या मार्गाला काही कारणांमुळे विलंब झाला होता. आता या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी दिली. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास एकूण ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल. इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई – नागपूर थेट अतिवेगवान प्रवास करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागणार असून 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे. औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूरला जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबईला 4 तासात पोहोचता येत आहे. अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचं काम सुरू आहे. हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जात आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा सामावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.