युवा स्वाभिमान पक्षाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांच अंतर्मन भाजपाचंच आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतातयेत. मात्र भाजप आता राणांचा युवा स्वाभिमान पक्षही संपवणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. आपला पक्ष लहान असला तरी आम्हाला कोणी संपवू शकत नाही. कारण आमच्याकडे गुणवत्ता असल्याचं ही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडी मविआसोबत येणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक बैठकी झाल्या मात्र वंचित सोबत असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यावर बच्चू कडू यांनी, लोकसभेची निवडणूक प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढणार असतील, त्यामुळेच ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जो पर्यत विधानसभेची बोलणी होत नाही तो पर्यत आम्ही कोणताही विचार केला नाही.भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे. लहान पक्षासोबत अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही. विधानसभेत किती जागा देणारं हे सांगावे नाही तर आम्ही स्वतंत्र आहे, आम्हाला कोणतही बंधन नाही, असा इशारा देत प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर माध्यमांनी नवनीत राणा यांना विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या होत्या, भाजपमध्ये जाणार ही चर्चा नेहमी सुरू असते बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते. त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो. तसंच आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो. असं म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक संकेत दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.