Farmers Protest: शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो मार्च' 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित, संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा

Delhi Chalo March: शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो मार्च' 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे.
Farmers Protest
Farmers ProtestSaam Tv
Published On

Farmers Protest Latest Update

संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली चलो मोर्चा (Delhi Chalo March) 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. खनौरी हद्दीत पत्रकारांशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते सर्बनसिंग पंढेर यांनी ही माहिती दिली. पुढील रणनीती 29 फेब्रुवारीला ठरवली जाईल. आज (रविवार 25 फेब्रुवारी) शेतकरी आंदोलनाचा 13 वा दिवस आहे. (Farmers Protest Latest Update)

शेतकरी नेते पंढेर यांनी सांगितलं की, 26 फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेची बैठक आहे. आज (25 फेब्रुवारी) रोजी आम्ही शंभू आणि खनौरी या दोन्ही ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होत (Farmers Protest) आहे, यावर चर्चासत्र आयोजित करणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

27 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांची बैठक

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी नेते सर्बनसिंग पंढेर पुढे म्हणाले, पोलिसांच्या कारवाईमुळे हरियाणात आणीबाणी निर्माण झाली (Farmers Protest Latest Update) आहे. डब्ल्यूटीओ शेतकऱ्यांसाठी आहे. आम्ही कृषी क्षेत्रातील जाणकारांना चर्चेसाठी बोलावू. आम्ही 27 फेब्रुवारीला शेतकरी संघटनांची बैठक घेणार आहोत. आम्ही 29 फेब्रुवारी रोजी आंदोलनासाठी आमची पुढील रणनिती जाहिर करू, असं त्यांनी म्हटलं आहे.

सर्बनसिंग पंढेर पुढे म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी करतो की, त्यांनी शेतकरी आणि मजुरांवर होत असलेल्या अत्याचारावर पुढे येऊन ( Kisan Morcha) बोलावं. हरियाणात 50 हजार सैन्य का तैनात करण्यात आले आहे, त्यामागे काही कारण आहे का, हेही सांगायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. देशातील शेतकरी आणि मजुरांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांवरील खटले मागे घ्यावेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Farmers Protest
Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर पोहोचणारं शेतकरी आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या दारात दाखल

शेतकरी मागण्यांवर ठाम

पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी शुभकरन सिंह यांच्या मृत्यूवरून शेतकरी नेते सर्बनसिंग पंढेर यांनी पंजाब सरकारला धारेवर धरले (Delhi Chalo March Update) आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणाला लागून असलेली सीमा अंशतः खुली केली आहे. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणालगतच्या सीमा जवळपास दोन आठवड्यांसाठी सील करण्यात आल्या होत्या.

शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते पंढेर यांनी सांगितलं (Farmers Protest News) आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता ती अनेक भागात पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Farmers Protest
Farmer Protest 2024 : अश्रूधुराच्या नळकांड्याला मिरची पावडरने प्रत्युत्तर; खनौरी सीमेवर शेतकरी आक्रमक, १२ पोलीस गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com