संरक्षण दल 'आत्मनिर्भर' होणार, अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू; दहशतवाद्यांचा मूळापासून खात्मा होणार

Testing of State Art Defense Systems : भारतीय लष्करानं अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेची चाचणी सुरु केलीय. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल भारतानं टाकलंय, आणि त्यामुळेच पाकला मोठी धडकी भरलीय.
Testing of State Art Defense Systems
Testing of State Art Defense SystemsSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त करून टाकलं. त्यात आता भारतीय लष्करानं स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंय. भारतीय लष्कर पोखरण, बाबिना, जोशीमठ, आग्रा आणि गोपालपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरु केलीय. या चाचणीचा उद्देश युद्धसदृश्य परिस्थितीआधी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षमता विकसित करणं हा आहे. यात कोणत्या संरक्षण प्रणालीची चाचणी केली जाणार आहे.

भारताची आत्मनिर्भर संरक्षण प्रणाली

1) मानवरहित हवाई प्रणाली (UAS)

UAS प्रणालीद्वारे हेरगिरी, नकाशे तयार करणे सहज साध्य

2) स्पेशलाइज्ड व्हर्टिकल लाँच (SVL) ड्रोन

SVL ड्रोन रनवेविना उड्डाण करण्यास सक्षम

लष्करी ऑपरेशन्स, हेरगिरी, बचावकार्यासाठी उपयुक्त

3) प्रिसिजन मल्टी म्युनिशन डिलिव्हरी सिस्टम

ड्रोनवर आधारित हत्यार प्रणाली

वेगवेगळी स्फोटकं आणि बॉम्बद्वारे अचूक लक्ष्यभेद

4) लो लेव्हल लाइट वेट रडार जमिनीपासून कमी उंचीवर उडणारे ड्रोन

हेलिकॉप्टरवर लक्ष ठेवण्यास सक्षम

हवाई धोक्यांचा शोध घेऊन लष्करी वापरासाठी उपयुक्त असतो

Testing of State Art Defense Systems
Anil Chauhan : 'पाकने विमान पाडलं', CDS चौहान यांची कबुली; ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा

२१व्या शतकातील नव्या आव्हानांसाठी भारतानं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरु केलीय. ज्यामुळे देशासमोरील धोक्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. संरक्षण प्रणालीची चाचणी 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेअंतर्गत विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. बदलेल्या भू-राजनैतिक पद्धतीनुसार आता आपल्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या चाचणीमुळे भारतीय सैन्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहेच. मात्र त्यामुळे पाकिस्तानची झोप उडालीय. कारण भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांचा खात्मा करेल म्हणून पाकिस्तानची झोप उडालीय.

Testing of State Art Defense Systems
Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट; ट्रायल झाली सुरु, प्रवास कधी करता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com