Anil Chauhan : 'पाकने विमान पाडलं', CDS चौहान यांची कबुली; ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा

CDS Anil Chauhan : संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा केलाय. ज्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकाराला घेरण्याच्या तयारीला सुरुवात केलीय.
Pakistan shot down a plane CDS anil Chauhan confession
Pakistan shot down a plane CDS anil Chauhan confessionSaam Tv News
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

नवी दिल्ली : संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा केलाय. ज्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकाराला घेरण्याच्या तयारीला सुरुवात केलीय. भारत-पाक संघर्षातील कोणती कबुली जनरल अनिल चौहान यांनी दिलीय. सिंगापूरमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याची कबुली दिली. त्यांच्या विधानानं एकच खळबळ उडालीय. मात्र भारताची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावलाय. त्यामुळे संरक्षण दलप्रमुखांचं नेमकं काय म्हणाले ते पाहूयात.

चौहान यांच्या विधानाच्या आधी ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एअरमार्शल ए.के. भारती यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं कबुल केलं होतं. मात्र पाकिस्ताननं किती विमानं पाडली,याची निश्चित आकडेवारी सांगण्यास नकार दिला होता. त्यांच्या विमानांनी आपल्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखून आम्ही पाकची काही विमानं पाडली. अर्थात त्याच्या बाजूने करण्यात आलेल्या हल्ल्यातही नुकसान झाले आहे. त्याची निश्चित आकडेवारी सांगण शक्य नाही.

Pakistan shot down a plane CDS anil Chauhan confession
MI Vs PBKS सामन्यादरम्यान पाऊस थांबला, उशीर झाल्याने Qualifier 2 सामना कमीत-कमी किती ओव्हर्सचा होणार?

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला पूर्व कल्पना दिल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना घेरलं होतं.

ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधींचे सवाल

1. कोणाच्या परवानगीनं हे झालं?

2. आपण किती लढावू विमानं गमावली?

असे अनेक सवाल राहुल गांधींना ऑपरेशन सिंदूनंतर उपस्थित केले होते. आता दस्तुरखुद्द सीडीएस अनिल चौहान यांनीच पाकिस्ताननं भारताची विमानं पाडल्याचं कबूल केल्य़ामुळे आता केंद्र सरकार याला दुजोरा देणार की हात झटकणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.

Pakistan shot down a plane CDS anil Chauhan confession
FYJC Admission : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मोठी अपडेट; पहिल्या फेरीच्या नोंदणीची महत्वाची अडचणार दूर होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com