CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द
Summary:
युद्धामुळे गल्फ देशांतील सीबीएसईने बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या
मध्यपूर्वेतील तणावामुळे विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय
सीबीएसई बोर्डाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
गल्फ देशांतील सीबीएसई शाळांवर युद्धाचा परिणाम
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य-पूर्वमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता बारावीच्या परीक्षेवर देखील झाला आहे. युद्धादरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसई बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएससीने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने बोर्डाने इराण, सौदी अरेबीया, यूएईसह ७ देशांमधील बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. १६ मार्च ते १० एप्रिलपर्यंत होणारे सर्व पेपर रद्द करण्यात आले आहेत.
सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. बोर्डाने यामागचे कारण देखील सांगितले. ते म्हणाले की, पश्चिम आशियातील युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा आयोजित करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. निकालाचे निकष बोर्डाकडून लकवरच जाहीर केले जातील.
बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील परीक्षा सीबीएसई बोर्डाने रद्द केल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि या प्रत्येक देशातील शाळा आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत १, ३, ५, ७ आणि ९ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. युद्धामुळे या सर्व देशांमधील परिस्थिती आणखी काही दिवस खराब राहण्याची शक्यता असल्याने सर्व परीक्षा रद्द करण्यात येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

