

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली
केप वर्डेमध्ये बस दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू
३७ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
डोंगराळ रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली
अफ्रिकेतील केप वर्डे येथे भीषण अपघाताची घटना घडली. या रस्ते अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी फोगो बेटाच्या डोंगराळ भागातील कॅम्पानास दे सिमा रस्त्यावर घडला. बसमधून ३७ जण प्रवास करत होते. डोंगराळ भागातील रस्त्यावरून जात असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेत. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण शोधले जात आहे. या अपघातानंतर अफ्रिकेमध्ये शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती जोसे मारिया परेरा नेवेस यांनी या अपघातप्रकरणी तीव्र दुःख व्यक्त केले असून या घटनेला राष्ट्रीय शोकांतिका म्हटले आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात साओ फिलिपे नगरपालिकेच्या हद्दीतील फोगो बेटाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात झाला. तीव्र उतारावर आणि तीव्र वळणांवर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यावरून घसरून सुमारे ३० मीटर खोल दरीत कोसळली. खडकाळ आणि खोल भागात बस कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले आणि प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातमध्ये २५ जणांनी जागीच प्राण सोडले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, स्थानिक प्रशासन आणि नागरी संरक्षण पथके तात्काळाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम डोंगराळ प्रदेशामुळे बचाव आणि मदतकार्यात मोठा अडथळा आला होता. तसंच जखमींना बसमधून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.